'दोन्ही नेते जेलमध्ये आहे. निवडणुकीसाठी 20 मिनिटं बाकी आहे. पण, मतदानासाठी परवानगी दिली तरी तुम्ही पोहोचू शकणार नाही
नवी दिल्ली, 20 जून : विधान परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. जवळपास सर्वच आमदारांनी मतदान पूर्ण केले आहे. मात्र, मतदानाला काही तास बाकी असताना सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी विधान परिषदेला मतदान करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दुपारी सुनावणी पार पडली. हायकोर्टापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही नवाब मलिक आणि देशमुख यांना परवानगी नाकारली आहे. ‘दोन्ही नेते जेलमध्ये आहे. निवडणुकीसाठी 20 मिनिटं बाकी आहे. पण, मतदानासाठी परवानगी दिली तरी तुम्ही पोहोचू शकणार नाही. जर तीन दिवसांपूर्वी याचिका दाखल केली असती तर विचार करता आला असता, असं मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. ( पीपीई कीट घालून भाजप आमदार मतदानाला, फडणवीस स्तब्ध राहिले उभा, VIDEO ) राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांच्या विरोधात ईडीची चौकशी सुरू असून ते सध्या जेलमध्ये बंद आहेत. मतदान करण्याची परवानगी देणारी त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली होती. त्या याचिकेला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होती. यापूर्वी 11 जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देखील त्यांना मतदान करता आले नव्हते. हायकोर्टाने मलिक आणि देशमुख यांना परवानगी नाकारली होती.