JOIN US
मराठी बातम्या / देश / 'हे' मंदिर मानले जाते एकतेचे उदाहरण, हिंदूंसोबतच मुस्लिम बांधवही होतात नतमस्तक

'हे' मंदिर मानले जाते एकतेचे उदाहरण, हिंदूंसोबतच मुस्लिम बांधवही होतात नतमस्तक

हे मंदिर एकतेचे उदाहरण म्हणून देशभरात ओळखले जाते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेरठ, 25 सप्टेंबर : भारतामध्ये देवीची अनेक प्रसिद्ध आणि सिद्ध मंदिरे आहेत. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये असे एक मंदिर आहे जिथे केवळ हिंदूच नाही तर मुस्लिम लोकही प्रार्थना करतात. हो, हे खरं आहे. हे मंदिर मेरठच्या नौचंडी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर हजारो वर्षे जुने आहे. हजारो वर्षे जुनी मातेची मूर्ती आजही येथे विराजमान आहे. तसेच शेकडो वर्षे जुनी ब्रिटीश तलवारही याठिकाणी आहे. हिंदू मुस्लिम एकतेचे उदाहरण - मातेच्या दर्शनासोबत भाविक याठिकाणी असलेल्या या ऐतिहासिक तलवारीपुढे नतमस्तक होतात. प्रत्येक दसऱ्याला तलवारीची शस्त्रपूजा केली जाते. मुस्लिम धर्म मानणाऱ्या महिलाही येथे पोहोचून नमाज अदा करतात, यावरून या मंदिराचे महत्त्व कळू शकते. हे मंदिर एकतेचे उदाहरण म्हणून देशभरात ओळखले जाते. या मंदिराच्या अगदी समोर बाले मियाँची कबर आहे. शेकडो वर्षे जुनी ब्रिटीश तलवार

शेकडो वर्षे जुनी ब्रिटीश तलवार

हेही वाचा -  महाराष्ट्रातला बडा नेता जेव्हा ‘सर्जाराजा’चे आभार मानतो, अतिशय हळवे आणि बोलके क्षण, पाहा VIDEO असे मानले जाते की, जे कोणी हिंदू बंधू-भगिनी येथे मंदिरात दर्शनासाठी येतात, बाले मियांच्या कबरीवर जातात आणि बाले मियांच्या समाधीवर येणारे सर्व मुस्लिम बांधव मग आईच्या दरबारात नतमस्तक होतात. दोन्ही धर्मांना मानणाऱ्या लोकांच्या मनोकामना दोन्ही ठिकाणी गेल्यावरच पूर्ण होतात, असे म्हणतात. एकात्मतेचे उदाहरण म्हणणाऱ्या नौचंडी मातेच्या नावाने शेकडो वर्षांपासून येथे नौचंडीची यात्राही भरते. ही यात्रा मेरठची ओळख आहे.

असे मानले जाते की, कोणत्याही धर्माच्या भक्ताने 40 दिवस सतत दिवा लावला तर त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते. मातेच्या दर्शनाबरोबरच येथे ठेवण्यात आलेली तलवारही भाविकांना मानाची आहे. या तलवारीने नौचंडी देवी माता, कोरोनालाही मारणार, असे येथील भाविक म्हणतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या