JOIN US
मराठी बातम्या / देश / BJP नेत्यांना लग्नाचं निमंत्रण देणं पडणार महागात, आकारला जाणार दंड

BJP नेत्यांना लग्नाचं निमंत्रण देणं पडणार महागात, आकारला जाणार दंड

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 85 दिवसांपासून गाजीपूर सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. हे आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी शेतकरी नेत्यांनी आता थेट भाजपच्या नेत्यांनर बहिष्कारच टाकला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 19 फेब्रुवारी : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 85 दिवसांपासून गाजीपूर सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. हे आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी पश्चिम उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये एका मासिक पंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. यात पंजाबचे शेतकरी नेते बलबीर सिंग राजजेवाल आणि भाकियूचे प्रदेशाध्यक्ष राजबीर जादौनही हजर होते. पंचायतीच्या व्यासपीठावर बोलताना भाकियू सुप्रीमो चौधरी नरेश टिकैत यांनी सरकारवर निशाणा साधला. नरेश टिकैत (Naresh Tikait) म्हणाले, की भाजपच्या (BJP)नेत्यांना लग्नाचं आमंत्रण (Marriage Invitation)  किंवा पत्रिका देऊ नका, हा आदेश आहे. इथून पुढे आपल्यातील एखाद्या व्यक्तीनं भाजपच्या नेत्याला लग्नासाठी निमंत्रण दिलं आणि तो नेता लग्नात पोहोचला तर पत्रिका देणाऱ्या व्यक्तीला दंड भरावा लागेल. हा दंड जेवणाच्या स्वरुपात असेल. संबंधित व्यक्तीला 100 लोकांसाठी स्पेशल जेवणाची व्यवस्था करावी लागेल. नरेश टिकैत म्हणाले, की शेतकऱ्यांची आंदोलनामुळे (Farmer Protest) भाजपमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण आहे. यामुळे भाजपचे 100 खासदार (MP) फुटू शकतात, असा दावाही त्यांनी केला. सोबतच त्यांनी लोकांना आवाहन केलं, की बलिदान देण्याची वेळ आल्यास त्यासाठीही तयार राहा. नरेश टिकैतनं नंतर अमित शाह (Amit Shah) यांच्यावरही निशाणा साधला. अमित शाह यांच्याबद्दल बोलताना नरेश टिकैत म्हणाले, की पश्चिम बंगालमधील (West Bengal Election) सभांमध्ये अमित शाह जय श्रीराम अशा घोषणा देत आहेत. मात्र, त्यांना हे माहिती नाही, की आम्ही रामचंद्र यांचे खरे वंशज आहोत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या