रांची, 21 जून: 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाण योगदिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रांचीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगासनाचं महत्त्वा आणि योगाबाबत लोकांना संबोधन केलं. मन प्रसन्न राहण्यासाठी व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. निरोगी राहण्यासाठी योगासन आणि प्राणायाम करायला हवा असंही त्यांनी सांगितलं.