JOIN US
मराठी बातम्या / देश / मुनव्वर फारूकीला आणखी एक धक्का; विश्व हिंदू परिषदेच्या 'त्या' पत्रानंतर दिल्लीतील शो रद्द

मुनव्वर फारूकीला आणखी एक धक्का; विश्व हिंदू परिषदेच्या 'त्या' पत्रानंतर दिल्लीतील शो रद्द

विश्व हिंदू परिषदेने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून मुनव्वरचा शो रद्द करण्याची मागणी केली होती. जर हा शो झाला तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे सदस्य याला विरोध करतील, असं ते म्हणाले होते. (Munawar Faruqui Show Cancel)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 27 ऑगस्ट : दिल्ली पोलिसांच्या लायसन्स युनिटने मुनव्वर फारुकीची विनंती फेटाळली आहे. कॉमेडियनने दिल्लीत परफॉर्म करण्याची परवानगी मागितली होती. त्याचा शो 28 ऑगस्ट 2022 रोजी दिल्लीतील सिविक सेंटरमध्ये होणार होता. यापूर्वी, सेंट्रल डिस्ट्रिक्ट पोलिसांनी युनिटला अहवाल देताना म्हटलं की मुनव्वरच्या शोचा “परिसरातील जातीय सलोख्यावर परिणाम होईल”. विश्व हिंदू परिषदेने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून मुनव्वरचा शो रद्द करण्याची मागणी केली होती. जर हा शो झाला तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे सदस्य याला विरोध करतील, असं ते म्हणाले होते. हे पत्र विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली अध्यक्ष सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना लिहिलं होतं. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला जम्मू-काश्मीरमधून मोठा धक्का! पत्रात लिहिलं होतं की, ‘मुनव्वर फारुकी नावाचा कलाकार 28 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या सिविक सेंटरमधील केदारनाथ स्टेडियममध्ये एक शो आयोजित करत आहे. हा व्यक्ती आपल्या शोमध्ये हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवतो, त्यामुळे भाग्य नगरमध्ये अलीकडे जातीय तणाव निर्माण झाला होता. मी तुम्हाला विनंती करतो की हा शो तात्काळ रद्द करा, अन्यथा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन करून शोचा निषेध करतील. 2021 मध्ये मुनव्वर फारुकीला त्याच्या शोमधील विनोदामुळे अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांनी एक महिना तुरुंगात काढला. तेव्हापासून कॉमेडियनचे शो हे कायदा आणि प्रशासनासमोर आव्हान बनले आहेत. गेल्या आठवड्यात मुनव्वर फारुकीचा बंगळुरूमधील शो रद्द करण्यात आला होता. कॉमेडियनने म्हटलं होतं की, हे त्याच्या तब्येतीच्या समस्येमुळे घडलं आहे. पण बंगळुरूमध्ये शो रद्द झाल्यानंतर एका दिवसानंतरच तो हैद्राबादमध्ये कडक सुरक्षेत परफॉर्म करताना दिसला. मुनव्वर फारुकीचा शो 20 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. याआधी तेलंगणाचे भाजप नेते टी राजा यांनी मुनव्वरला हैदराबादमध्ये शो करण्याची परवानगी दिल्यास शोचे ठिकाण जाळून टाकण्याची धमकी दिली होती. मुनव्वर फारुकी कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता. या शोमध्ये मुनव्वरने अनेक सेलिब्रिटींना मागे टाकत विजय मिळवला होता. मात्र, याचा त्याच्या कॉमेडी करिअरला फारसा फायदा झाला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या