JOIN US
मराठी बातम्या / देश / राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलले, केंद्र सरकारचा निर्णय

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलले, केंद्र सरकारचा निर्णय

दिल्लीत मुघलकालीन शासकांच्या नावाने असलेल्या अनेक रस्त्यांची नावेही या आधी बदलण्यात आली आहेत. औरंगजेब रोडचं नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम रोड असं करण्यात आलं होतं.

जाहिरात

mughal garden name changed

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 28 जानेवारी : केंद्र सरकारने राष्ट्रपती भवनात असलेल्या मुघल गार्डनचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने मुघल गार्डनचे नाव बदलले. आता मुघल गार्डनचे नाव अमृत उद्यान असं असणार आहे. दिल्लीत मुघलकालीन शासकांच्या नावाने असलेल्या अनेक रस्त्यांची नावेही या आधी बदलण्यात आली आहेत. औरंगजेब रोडचं नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम रोड असं करण्यात आलं होतं. राष्ट्रपती भवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात असं सांगण्यात आलं आहे की, या वर्षी ३१ जानेवारीपासून २६ मार्चपर्यंत लोकांसाठी अमृत उद्यान (मुघल गार्डन) खुलं ठेवण्यात येईल. २८ मार्चला फक्त शेतकऱ्यांसाठी तर २९ मार्चला दिव्यांगांसाठी गार्डन उघडण्यात येईल. तर ३० मार्चला पोलिस, सुरक्षा बल आणि लष्कराच्या सेवेत असलेल्यांच्या कुटुंबियांना गार्डनमध्ये प्रवेश असेल. हेही वाचा :  लाखो रुपये तिकीट तरीही गंगा विलास क्रूझचं 2 वर्षांचं बुकिंग फुल, सुविधा पाहून व्हाल हैराण! गार्डनला भेट देणाऱ्यांना सुंदर फुले पाहता येतील. अमृत उद्यानात १२ प्रकारची सुंदर अशी ट्युलिपची फुलं आहेत. उद्यान लवकरच सर्वसामान्यांसाठी उघडण्यात येणार आहे. या उद्यानात अनेक प्रकारची सुंदर फुलं आणि झाडं आहेत. यात ट्युलिप आणि गुलाबाची फुले लोकांना आकर्षित करतात. राष्ट्रपती भवनाकडून असंही सांगण्यात आलं आहे की, अमृत उद्यानात त्याच लोकांना जाण्यास परवानगी असेल ज्यांनी ऑनलाइन बूकिंग केलं असेल. सुरक्षेच्या कारणास्तव वॉक इन एन्ट्री दिली जाणार नाही. गेल्या वर्षीही थेट प्रवेश देण्यात आला नव्हता. ऑनलाइन बूकिंग केल्यानतंरच गार्डनमध्ये प्रवेश दिला गेला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या