अमरावती 21 डिसेंबर : गेल्या 2-3 वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले होते. तर अनेकांनी याकाळात जीवही गमावला. आता कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. मात्र, काही लोक असे आहेत ज्यांच्या मनात अजूनही कोरोनाबद्दल प्रचंड भीती आहे. अशाच दोन महिलांची माहिती समोर आली आहे. आंध्रप्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यातील या दोन महिला कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीने दोन वर्ष घरातच कैद राहिल्या. ती चूक चीनला भोवली; कोरोनामुळे 21 लाख लोकांचा जीव जाण्याची शक्यता, भारतातील स्थिती काय? काकीनाडाच्या कुययेरू गावातून मंगळवारी एक अजब घटना समोर आली. कुटुंबाच्या प्रमुखाने दोघींची प्रकृती खालावल्याची माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी महिला आणि तिच्या मुलीला काकीनाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं. महिलांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडण्यास नकार दिला, यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. अखेर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला समजावून दार उघडण्यास भाग पाडलं आणि बळजबरीने रुग्णालयात नेण्यात आलं. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोन्ही महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा संशय आहे. मणि आणि त्यांची मुलगी दुर्गा भवानी यांनी 2020 मध्ये कोविडचा प्रसार वाढल्यानंतर स्वतःला घराच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त केलं. महामारी नंतर आटोक्यात आली असली तरी त्या दोघी एकाकी राहिल्या. मणीचा नवरा तिला जेवण आणि पाणी पुरवत होता पण गेल्या एक आठवड्यापासून ती त्याला तिच्या खोलीत येऊ देत नव्हती. यानंतर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. …तर मंकीपॉक्स घेणार कोरोनापेक्षाही घातक महामारीचं रूप, संशोधनातून चिंता वाढवणारी माहिती समोर राज्यातील ही अशा प्रकारची दुसरी घटना आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अशीच एक घटना उघडकीस आली होती. कोविडची लागण होण्याच्या भीतीने तीन महिलांनी जवळपास 15 महिने स्वत:ला घरात कैद केलं होतं. त्याचवेळी, कोविडमुळे शेजाऱ्याच्या मृत्यूनंतर एका जोडप्याने आणि त्यांच्या दोन मुलांनी स्वतःला आयसोलेट केलं होतं. सरकारी योजनेंतर्गत निवासी भूखंड देण्यासाठी गावातील एक स्वयंसेवक अंगठ्याचा ठसा लावण्यासाठी गेला तेव्हा ही बाब उघडकीस आली.