Modi@8 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या विविध राज्यांच्या भेटीत तिथल्या पारंपारिक वेशात लोकांशी संवाद साधला. लोकांच्यातील एक बनून वावरण्याची कला पंतप्रधान मोदींना चांगलीच साधलीय, हे तुमच्याही लक्षात येईल. अशाच सार्वजनिक कार्यक्रमांमधले त्यांचे टॉप आठ लुक्स पाहा.
फेब्रुवारी 2022 मध्ये नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या निवासस्थानी अफगाणिस्तान शीख-हिंदू शिष्टमंडळाने मोदींची भेट घेतली. या मंडळातील अफगाणिस्तानातील शीखांनी पंतप्रधानांना पारंपारिक अफगाणी पोशाख आणि शिरोभूषण भेट दिलं होतं. पंतप्रधान मोदींनी त्याचा स्वीकार करून हा पोशाख परिधान केला होता. (Image : pmindia.gov.in)
पंतप्रधानांनी तमिळनाडू येथे तमिळ लोकांचा पोशाख सदरा आणि लुंगी परिधान केला होता. या वस्त्रांमध्येच त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन यांच्यासोबतचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला होता. 'तमिळांची संस्कृती जगाला कळू द्या,' असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं होतं. ऑक्टोबर 2019 मध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत ही भेट झाली होती. (Image : Instagram)
पंतप्रधान मोदींनी डिसेंबर 2022 मध्ये त्यांच्या जम्मू आणि काश्मीर भेटीचा हा फोटो शेअर केला. यात त्यांनी पारंपरिक काश्मिरी पोशाख परिधान केला आहे. (Image : Instagram)
नोव्हेंबर 2019 मध्ये पंजाबमधील करतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत पारंपरिक शीख पेहरावामध्ये. (Image : Instagram)
मे 2019 मध्ये केदारनाथ येथे पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडचा पारंपारिक पोशाख परिधान केला. (Image : Instagram)
पंतप्रधान मोदी फेब्रुवारी 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये एका कार्यक्रमात एका मेळाव्याला संबोधित करताना. (Image : pmindia.gov.in)
PM मोदींनी फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीचा एक फोटो शेअर केला. (Image : Instagram)
2014 मध्ये नागालँडमधील हॉर्नबिल फेस्टिव्हलमध्ये मोदी. या वेळी, त्यांच्या डोक्यावर अगदी आगळं-वेगळं शिरोभूषण पाहायला मिळालं (Image : इंस्टाग्राम)