JOIN US
मराठी बातम्या / देश / BREAKING : उत्तरकाशीमध्ये हाहा:कार, 32 प्रवाशांनी भरलेली मिनीबस दरीत कोसळली, मोठी दुर्घटना

BREAKING : उत्तरकाशीमध्ये हाहा:कार, 32 प्रवाशांनी भरलेली मिनीबस दरीत कोसळली, मोठी दुर्घटना

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तरकाशीमध्ये यमनोत्री महामार्गावर डामटा परिसराजवळ मोठा अपघात घडला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उत्तरकाशी (उत्तराखंड), 5 जून : उत्तराखंडच्या उत्तरकाशी (Uttarkashi) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तरकाशीमध्ये यमनोत्री महामार्गावर (Yamonotri Highway) डामटा (Damta) परिसराजवळ अपघाताची मोठी घटना घडली आहे. तिर्थयात्रेसाठी निघालेली एक मिनीबस दरीत कोसळली आहे. या मिनीबसमध्ये 32 भाविक होते. या भाविकांपैकी बहुतेकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. घटना समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून तातडीने बचाव कार्याला सुरुवात झाली. संबंधित परिसर हा घाट परिसर असल्याने रेस्क्यू करणं थोडं कठीण जात असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डीजीपी अशोक कुमार यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. पोलीस आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झालेली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आतापर्यंत 4 जखमींना रेस्क्यू करण्यात आलं आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह सापडले आहेत. इतर प्रवाशांचा शोध सुरु आहे. रात्रीच्यावेळी अंधार असल्याने रेस्क्यू ऑपरेशनसाठी अडचणी येत आहेत. या अपघातग्रस्त बसमध्ये मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील 29 नागरीक होते. चारधामसाठी जिल्ह्यातून दोन बस निघाल्या होत्या. या बस यमुनोत्री धाम जात होते. या दरम्यान संबंधित घटना घडली, अशी माहिती अशोक कुमार यांनी दिली. ( यंदा पंढरपूर वारी निघणारच, अजित पवार यांनी केली घोषणा ) विशेष म्हणजे सहा दिवसांपूर्वीच उत्तरकाशीमध्ये घाटात मोठा अपघात घडला होता. उत्तरकाशीच्या गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर अशीच एक गाडी दरीत कोसळली होती. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला होता. तर 13 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. संबंधित घटना ही गेल्या रविवारी रात्रीच्या वेळी घडली होती. या अपघातातील जखमी आणि मृत पावलेले सर्व प्रवासी हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद जि्ल्ह्यातील होते. उत्तरकाशीमध्ये वारंवार अशाप्रकारच्या अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे वाहनचालकांना घाटात गाडी काळजीपूर्वक चालवण्याचं सातत्याने आवाहन केलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या