JOIN US
मराठी बातम्या / देश / पीडितेनं कपडे घातले असले तरीही जबरदस्तीनं शारीरिक संबंधांचा प्रयत्न हा बलात्कारच : High court चा मोठा निर्णय

पीडितेनं कपडे घातले असले तरीही जबरदस्तीनं शारीरिक संबंधांचा प्रयत्न हा बलात्कारच : High court चा मोठा निर्णय

पीडित महिलेनं कपडे घातले असले तरी तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हाही बलात्कार ठरतो, असा निर्णय न्यायालयानं दिला आहे. या प्रकरणात न्यायालयानं आरोपीची शिक्षा कायम ठेवली. हा निर्णय महिलांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 मार्च : दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार (woman abuse cases) वाढत आहेत त्या तुलनेत कायदे सक्षम आणि कठोर होण्याची मागणीही जोर धरत आहे. निर्भया प्रकरणासह आणखी काही खटल्यांमध्ये न्यायालयाकडून तितकेच कडक निर्णयही दिले जात आहेत. अशा निर्णयांचं समाजातून स्वागत होत आहे. पीडित महिलेनं कपडे घातले असले तरी तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हाही बलात्कार ठरतो, असा निर्णय न्यायालयानं दिला आहे. हा निर्णय निश्चितपणे महिला सुरक्षेच्या (woman security) दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. पीडित महिलांना त्यांच्यावर बलात्कार (rape) झाल्याचं किंवा तसा प्रयत्न झाल्याचा न्यायालयात सिद्ध करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय, मोठ्या प्रमाणात मनस्तापाही होतो. मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळं अशा महिलांना दिलासा मिळणार आहे. पीडित महिलेनं अंडरपॅन्ट घातली असली तरी त्यावरूनही शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या हेतूनं तिच्या मर्जीविरुद्ध तिला पुरुषानं लिंगाचा स्पर्श केल्यास तो बलात्कारच ठरतो, असं न्यायालयानं म्हटलं आहे. मेघालयातील उच्च न्यायालयानं (Meghalaya High Court) हा निर्णय दिला आहे. हा निकाल 2006 च्या एका खटल्याशी संबंधित आहे. 23 सप्टेंबर 2006 रोजी 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग (child abuse) झाला होता. या प्रकरणी 30 सप्टेंबर 2006 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. वैद्यकीय तपासणीत पीडितेच्या प्रायव्हेट पार्टला इजा झाल्याचं समोर आलं. वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, पीडितेच्या प्रायव्हेट पार्टच्या (हायमेन - hymen) आतील भागाला तिच्या कोणत्याही वैयक्तिक शारीरिक हालचालींमुळं इजा झाली नसून शरीराचा इतर काही भाग रगडल्यामुळं ती इजा झाली आहे. हे वाचा -  भगवंत मान यांच्यामुळे 7 वर्षांनी पित्याला सापडला बेपत्ता मुलगा, काय आहे प्रकरण? या प्रकरणातील संशयित चीअरफुलसन स्नैतांग याला त्याच्या कबुलीजबाबाच्या आधारे ट्रायल कोर्टाने 2018 मध्ये दोषी ठरवलं होतं. मात्र स्नैतांगनं आपला कबुलीजबाब मागे घेतला आणि कार्यकारी दंडाधिकार्‍यांसमोर हजर केलं असता त्याच्या शब्दांचा अधिकाऱ्यांनी चुकीचा अनुवाद केला, असं सांगून या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केलं. त्याच्या वकिलानं युक्तिवाद केला की, त्यानं फक्त मुलीच्या अंतर्वस्त्रावर त्याच्या लिंगानं स्पर्श केला होता. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी पीडित तरुणीनंही सांगितलं की, घटनेदरम्यान आरोपीनं तिची अंतर्वस्त्रं काढली नाहीत. पीडितेनं असंही म्हटलं की, तिला नंतर वेदना जाणवल्या नाहीत. परंतु, न्यायालयानं वैद्यकीय निष्कर्ष विचारात घेतले आणि घटनेनंतरच्या दिवसांत तपासणीदरम्यान तिनं वेदना होत असल्याचं सांगितलं होतं. हे वाचा -  ‘द कश्मीर फाइल्स या लिंकवर फ्रीमध्ये’, असा SMS आला आहे? बँक खातं होईल रिकामं IPC च्या कलम 375 (b) नुसार, महिलेच्या संमतीशिवाय पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टचा तिच्या प्रायव्हेट पार्टशी संबंध आणणं हा बलात्कार आहे. न्यायालयानं आपला निर्णय देताना म्हटलं की, “भारतीय दंड संहिता (IPC) कलम 375 अंतर्गत बलात्काराच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टचा प्रवेश करणं हे बलात्काराच्या श्रेणीत येतं. अशा स्थितीत पीडितेनं घटनेच्या वेळी अंतर्वस्त्रं घातलेलं असलं, तरीही हा बलात्कारच म्हणावा लागेल. या प्रकरणात न्यायालयानं स्नैतांगची शिक्षा कायम ठेवली. त्याला 2018 मध्ये 10 वर्षांचा कारावास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या