JOIN US
मराठी बातम्या / देश / आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून पत्नीचीच हत्या, घटनेने मिझोराममध्ये खळबळ

आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून पत्नीचीच हत्या, घटनेने मिझोराममध्ये खळबळ

या स्फोटात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर आरोपीला जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर :  आत्मघातकी बॉम्बस्फोट (Suicide Bombing) म्हणजे दहशतवादी हल्ला असं समीकरण सर्वांच्या मनात पक्कं झालं आहे; मात्र मिझोराममधल्या (Mizoram) एका पतीनं (Husband) आपल्या पत्नीची (Wife) हत्या करण्यासाठी आत्मघातकी बॉम्बस्फोटाची पद्धत वापरल्यानं एकच खळबळ माजली आहे. मिझोराममधलं लुंगलेई शहर मंगळवारी (5 ऑक्टोबर) एका आत्मघातकी बॉम्बस्फोटानं हादरलं. पोलीस आणि सुरक्षा दलं सतर्क झाली; पण हा आत्मघातकी बॉम्बस्फोट दहशतवाद्यांनी नव्हे तर एका पतीनं घडवून आणल्याचं नंतर स्पष्ट झालं. नवभारत टाइम्स नं दिलेल्या वृत्तानुसार, लुंगलेई शहरातल्या (Lunglei) चन्मारी लेंग या बाजारपेठ परिसरात एचपीसी (हाय पॉवर कमिटी) कार्यालयासमोर भर दुपारी ही भीषण घटना घडली. 62 वर्षीय रोहमिंग्लियाना यानं आपली 61 वर्षीय पत्नी तलांग थियांगलिमी हिला आत्मघातकी बॉम्बस्फोट करून उडवून दिलं. या स्फोटात तलांग थियांगलिमी हिचा जागीच मृत्यू झाला, तर जबर जखमी झालेल्या रोहमिंग्लियाना याचा रुग्णालयात मृत्यू झाला. लुंगलेई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रेक्स वांछवांग यांनी माध्यमांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुरुष हा त्या महिलेचा दुसरा नवरा होता; पण दोघेही गेल्या एका वर्षापासून वेगळे राहत होते आणि काही महिन्यांपूर्वी त्यांचा घटस्फोट (Divorce) झाला होता. तलांग थियांगलिमी या परिसरात भाजीचं दुकान लावत असे. तिची मुलगीही तिथेच जवळच एक स्वतंत्र स्टॉल लावत असे. लेकाच्या सुखासाठी सुनेसह चौघांची हत्या; मात्र प्रकरण उलटल्याने स्वत:लाच दिली भयावह शिक्षा मंगळवारी दुपारी आरोपी रोहमिंग्लियाना थियांगलिमी हिच्या दुकानात आला आणि त्याने तिला एक स्थानिक सिगारेट देण्यास सांगितले. थियांगलिमी हिने त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर रोहमिंग्लियाना यानं सिगारेट पेटवली आणि आपल्याला बरं वाटत नाही, चक्कर येत आहे, असं सांगू लागला. बोलता बोलताच तो थियांगलिमीच्या जवळ गेला आणि कोणाला काही समजण्याआधीच त्यानं ट्रिगर दाबला आणि दुसऱ्या क्षणी तिथं जबरदस्त स्फोट झाला. स्फोटाचा प्रचंड आवाज ऐकून सगळीकडे एकच खळबळ उडाली. रोहमिंग्लियाना हिंसक स्वभावाचा होता. तो घरगुती हिंसाचारही करत असे, असं त्याला ओळखणाऱ्या काही जणांनी सांगितलं. दरम्यान, या स्फोटात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर आरोपीला जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे त्याचाही मृत्यू झाला. या स्फोटात जिलेटिनचा वापर करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 302 आणि सीआरपीसी कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचं पोलीस अधीक्षक रेक्स वांछवांग यांनी स्पष्ट केलं. मिझोराममध्ये पती-पत्नी विभक्त होण्याच्या घटना सर्रास घडतात; मात्र अशाप्रकारे आत्मघातकी बॉम्बस्फोटासारखी पद्धत वापरून पत्नीची हत्या करण्याची घटना आतापर्यंत कधीही घडली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या