JOIN US
मराठी बातम्या / देश / Mahant Narendra Giri Death: महंत गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणं ताब्यात, गनरचीही होणार चौकशी-सूत्र

Mahant Narendra Giri Death: महंत गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणं ताब्यात, गनरचीही होणार चौकशी-सूत्र

Mahant Narendra Giri Death: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी प्रयागराज पोलिसांनी अनेक राजकीय पक्षांशी संबंधित अर्धा डझनहून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सर्वेश दुबे, प्रयागराज, 21 सप्टेंबर: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद (Mahant Narendra Giri Death) मृत्यू प्रकरणी प्रयागराज पोलिसांनी अनेक राजकीय पक्षांशी संबंधित अर्धा डझनहून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सर्व लोकांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांच्या सुरक्षेतील गनरचीही चौकशी केली जाणार आहे. महंत यांना Y श्रेणी सुरक्षा मिळाली होती. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह प्रयागराजमधील बाघंबरी मठ याठिकाणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यांच्या मृत्यूनंतर खोलीचा तपास केला असता एक सुसाइड नोट (Suicide Note of Narendra Giri Maharaj) सापडली होती. या नोटमध्ये त्यांनी शिष्य आनंद गिरी यांचा त्यांच्यामुळे महंत तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आता महंत यांचे शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. प्रयागराज पोलिसांनी महंतांच्या मृत्यूबाबत एक नोट जारी केली आहे. यानुसार, घटनास्थळाहून 6 ते 7 पानी सुसाइड नोट सापडली आहे. या सुसाइड नोटमधील उल्लेखानंतर एका रात्रीतच आनंद गिरी यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. हे वाचा- ‘नरेंद्र गिरी महाराजांना स्वाक्षरी करणंही कठीण होतं…’,सुसाइड केसमध्ये ट्विस्ट पोलिसांच्या हाती लागलेत कॉल डिटेल्स या प्रकरणात पोलिसांना मोबाईलचा कॉल डिटेल अहवाल प्राप्त झाला आहे, ज्यात अनेक महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या 6 ते 10 तासांपूर्वी ज्यांनी महंत यांच्याशी संभाषण केले आहे त्या सर्वांची पोलीस चौकशी करतील. प्रयागराज पोलिसांना महंत यांच्या मृत्यूबाबत एक व्हिडीओही मिळाला आहे, ज्याची चौकशी केली जात आहे. महंत नरेंद्र गिरी आणि त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यात वाद झाला होता. त्याच्या मृत्यूला या वादाशी जोडून पोलिसही तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या