JOIN US
मराठी बातम्या / देश / 'तुझ्या आईला सांग, एक दिवस मी CM बनणार'; 22 व्या वर्षी प्रेमात पडलेल्या आसामच्या नव्या मुख्यमंत्र्यांची Love Story

'तुझ्या आईला सांग, एक दिवस मी CM बनणार'; 22 व्या वर्षी प्रेमात पडलेल्या आसामच्या नव्या मुख्यमंत्र्यांची Love Story

कॉटन कॉलेजात शिकत असताना, हिमंत यांनी रिनिकी (Riniki Bhuyan) यांना म्हटलं होतं, की तुझ्या आईला सांग, मी एक दिवस मुख्यमंत्री बनेल. ही गोष्ट त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच बोलून दाखवली होती. रिनिकी भुयन आता त्यांच्या पत्नी आहेत.(Love Story of Himanta Biswa Sarma)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुवाहाटी 11 मे : आसामचे नवीन मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांना महाविद्यालयात असतानापासूनच खात्री होती, की ते एक दिवस आसामचे मुख्यमंत्री (Assam CM) होतील. कॉटन कॉलेजात शिकत असताना, हिमंत यांनी रिनिकी (Riniki Bhuyan) यांना म्हटलं होतं, की तुझ्या आईला सांग, मी एक दिवस मुख्यमंत्री बनेल. ही गोष्ट त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच बोलून दाखवली होती. रिनिकी भुयन आता त्यांच्या पत्नी आहेत.(Love Story of Himanta Biswa Sarma) आसामचे पंधरावे मुख्यमंत्री झाल्यानंतर हिमंत यांच्या पत्नी रिनिकी यांनी माध्यमांसोबत बातचीत करताना सांगितलं, की हिमंत कॉलेजला असतानापासून या गोष्टीवर ठाम होते, की पुढे आयुष्यात त्यांना काय करायचं आहे. अभ्यासातही ते पूर्ण लक्ष देत असत. रिनिकी यांनी सांगितलं, की हिमंत त्यांना भेटले तेव्हा ते 22 वर्षाचे तर रिनिकी 17 वर्षांच्या होत्या. जेव्हा रिनिकीनं विचारलं, की मी माझ्या आईला काय सांगू तेव्हा हिमंत म्हणाले, की त्यांना सांग की एक दिवस मी आसामचा मुख्यमंत्री बनेल. हे ऐकून सुरुवातील रिनिकी आश्चर्यचकीत झाल्या. मात्र, नंतर त्यांच्या हे लक्षात आलं, की त्या ज्या व्यक्तीसोबत लग्न करणार आहेत, त्याचं एक ठरवलेलं लक्ष्य आहे. राज्यासाठी स्वप्न आणि दृढनिश्चय आहे. रिनिकी यांनी सांगितलं, की हिमंत आमदार असताना आमचं लग्न झालं. नंतर ते मंत्री बनले. हा संपूर्ण राजकीय प्रवासच होता, मात्र जेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा हे खरं आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, रिनिकी यांनी सांगितलं, की एक दिवसआधी हिमंत म्हणाले, की मुख्यमंत्री पदाचा दावेदार. यावर रिनिकी यांनी कोण असा सवाल केला. यावर हिमंत यांनी मी असं उत्तर दिलं. रिनिकी म्हणाल्या, हिमंत नेहमी माझी हिंमत राहीले. मी कधीच त्यांना मुख्यमंत्रीपदासोबत जोडूनच पाहिलं नाही. त्यामुळे, यासाठी मला थोडा वेळ लागेल. हिमंत यांचं कौतुक करताना रिनिकी म्हणाल्या, की राज्यातील कोरोना स्थिती त्यांनी ज्याप्रकारे सांभाळली ते कौतुकास्पद आहे. कोरोना अजूनही संपला नसला तरी त्यांनी ही लढाई इमानदारीनं लढली आहे. हिमंत यांची पत्नी मीडिया उद्योजक आहे आणि दोघांना दोन मुलं आहे. त्यांचं वय 19 आणि 17 वर्ष आहे. हिमंत यांनी कॉटन कॉलेजमधून आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. गर्व्हरमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबी आणि गुवाहाटी युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल साइन्समध्ये पीएचडी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या