JOIN US
मराठी बातम्या / देश / 'लव्ह जिहाद'चा संशय, विश्व हिंदू परिषदेकडून मुस्लिम तरुणांना कॉलेजमध्ये घुसून मारहाण

'लव्ह जिहाद'चा संशय, विश्व हिंदू परिषदेकडून मुस्लिम तरुणांना कॉलेजमध्ये घुसून मारहाण

गुजरातच्या सुरतमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. लव्ह जिहादशी संबंधी विषय असल्याचा संशय विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुरत, 23 नोव्हेंबर : गुजरातच्या सुरतमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. लव्ह जिहादशी संबंधी विषय असल्याचा संशय विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना होता. याच संशयातून या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. सूरतच्या भगवान महावीर कॉलेजमधली ही धक्कादायक घटना आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांना विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे. भगवान महावीर कॉलेजमध्ये काही विद्यार्थी हिंदू मुलींशी संपर्क वाढवत होते, असा आरोप विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी आपण एक सर्व्हे केला, या सर्व्हेमध्ये मुस्लिम युवक हिंदू तरुणींसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते, असं समोर आलं. आम्ही या तरुणांचा शोध सुरू केला, असा दावा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

‘दोन-तीन युवक षडयंत्र रचत होते. विद्यार्थिनींशी ही मुलं सोशल मीडियावर चॅटिंग करायचे आणि मैत्री वाढवायचे. एकमेकांना मोबाईल नंबर देऊन मैत्रीचं रुपांतर प्रेमात करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हे लक्षात आल्यानंतर आमचे कार्यकर्ते कॉलेजमध्ये गेले,’ असं विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आलं. ‘लव्ह जिहाद संपूर्ण देश आणि शहरात वाढत आहे. हिंदू मुलींना प्रेमात फसवलं जात आहे आणि या मुलींना शेवटी आत्महत्या करायला मजबूर केलं जात आहे,’ असं विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश नावडिया म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या