JOIN US
मराठी बातम्या / देश / एका चुकीमुळे आयुष्य संपलं; ट्रेनवर चढून सेल्फी घेण्यासाठी मोबाइल धरला वर आणि...

एका चुकीमुळे आयुष्य संपलं; ट्रेनवर चढून सेल्फी घेण्यासाठी मोबाइल धरला वर आणि...

तरुणासोबत हा प्रकार घडताच त्याच्यासोबत आलेले मित्र फरार झाले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बाराबंकी, 30 नोव्हेंबर :  उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी भागात सेल्फीच्या वेडापायी एका तरुणाचा जीव गेला आहे. बाराबंकीमधील फतेहपुर रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या मालगाडीवर चढून सेल्फी (Selfy) घेत असताना तरुणाला हाय वोल्टेज लाइनचा झटका लागला. करंट लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही बातमी समोर येताच सर्वत्र गोंधळ उडाला आहे. जीआरपीचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. अद्याप तरुणाची नेमकी माहिती समोर आलेली नाही. बाराबंकीमधील फतेहपूर रेल्वे स्टेशनवर रविवारी सायंकाळी ही दुर्देवी घटना घडली. सांगितले जात आहे की, स्टेशनच्या तिसऱ्या ट्रॅकवर तब्बल अडीच महिन्यांपासून मालगाडी उभी होती. रविवारी सायंकाळी काही तरुण रेल्वे स्टेशनवर गेले. यापैकी एक तरुण शिडीने मालगाडीच्या टपावर चढला. तेथे जाऊन तो सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान मालगाडीच्या वर असलेल्या हाय वोल्टेड लाइन त्याने पाहिली नाही. सेल्फी घेत असताना त्याला करंट लागला. करंट इतका जलद होता की तरुणाचं शरीर काही क्षणात जळून खाक झालं. हे पाहून त्याच्यासोबत आलेल्या तरुणांनी तेथून पळ काढला. हे ही वाचा- COVID-19 पसरल्याच्या अफवेने कारागृहात कैद्यांचा उद्रेक, 8 जणांचा मृत्यू यानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले. सूचना मिळताच जीआरपी इन्स्पेक्टर आरपी सिंह हजर झाले. रेल्वे विभागातील टेक्निकलचा भाग सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विद्युत लाइन बंद केली. ज्यानंतर तरुणाचा मृतदेह मालगाडीवरुन उतरवण्यात आला. जीआरपींनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. जीआरपी ठाणे प्रभारींनी सांगितलं की, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या