श्रीनगर, 07 जून: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये (Kupwada) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक (Clashes between militants and security forces) सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir police) सांगितले की, त्यांना कुपवाडा येथील चक्र कांडी येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं सर्च ऑपरेशन सुरू केलं. स्वत:ला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीनुसार, या चकमकीत दोन दहशतवादी (Two Terrorists) ठार झालेत. कुपवाडामधील चकमकीत मंगळवारी पहाटे कुपवाडा जिल्ह्यातील कांडी भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज पहाटे कांडीमध्ये शोधमोहीम सुरू केल्यानंतर चकमक सुरु झाली.
दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दल चोख प्रत्युत्तर दिलं. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितलं की, लष्करचे दोन दहशतवादी चकमकीत ठार झाले. तर तुफैल असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो पाकिस्तानचा रहिवासी होता. गेल्या 12 तासांतील ही दुसरी चकमक आहे. याआधी सोमवारी संध्याकाळी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी सुरक्षा दलांनी चकमकीत ठार केला. अंधाराचा फायदा घेत दोन पाकिस्तानी आणि एक स्थानिक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल, पाच मॅगझिन आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार त्याची ओळख हंजला, पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी आहे. Monkeypox चं संक्रमण वेगानं, ‘या’ देशातल्या आकड्यानं वाढवली जगाची चिंता सोपोरच्या जलूर भागातील पानीपोरा जंगलात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीवर कारवाई करत सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, शोध मोहिमेदरम्यान घटनास्थळी लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ज्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर ऑपरेशनचे चकमकीत रूपांतर झाले. खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. अतिरेक्यांनी अलीकडेच आठ लोकांच्या हत्येला लक्ष्य केलं आहे. ज्यात बिगर मुस्लिम, सुरक्षा कर्मचारी, एक कलाकार आणि स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सातत्याने सुरू आहे. 4 जून रोजी हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर एचएम निसार खांडे अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मारला.