भोपाळ, 12 फेब्रुवारी: कर्नाटकमध्ये (Karnataka News) हिजाबवरुन (Hijab Case) सुरू असलेल्या वादानंतर मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Viral Video) एक व्हिडीओही समोर आला होता. यात काही तरुणी हिजाब घालून बुलेट चालवित असल्याचं दिसत होतं. भोपाळच्या खान सिस्टर्सचा बुरख्यातील व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. याला अनेकांनी पाठिंबा दिला तर अनेकांनी टीकाही केली. या व्हिडीओमध्ये चार बहिणी असून त्यांचं म्हणणं आहे कि, मुस्लीम तरुणींना कधी काय घालायचं हे त्यांच्यावरच सोडून दिलं जावं. कपड्यांवरुन कोणी जबरदस्ती करू शकत नाही. त्या पुढे म्हणतात कि, आपल्या देशात लोकशाही आहे, आणि कोणी कोणते कपडे घालावे हा त्याच्या अधिकार आहे. यावरुन काही राजकीय मंडळी मुद्दा करून हिंदू-मुस्लीमांमध्ये फूट पाडण्याचं काम करीत आहे. सोशल मीडियावर खान सिस्टर्सच्या नावावरुन भोपाळमधील चार सख्ख्या बहिणी बऱ्याच काळापासून हिजाब-बुरख्यात दिसून येत आहे. या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन खान सिस्टर्स बुरखा-हिजाबमध्ये बुलेट चालवताना, एकत्र फिरताना, हॉकी स्टिक हातात घेऊन फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. हिजाब-बुरखा मुस्लीम धर्माचा पोशाख.. खान सिस्टर्समधील सर्वात लहान बहिणीचं (19 वर्षे) म्हणणं आहे कि, हिजाब-बुरखा आमच्या धर्माचा पोशाख आहे. इस्लानिक नॉलेज आणि इच्छेने लोक हा पोशाख घालतात. आता तरुणींनी काय पोशाख करावा हे त्यांच्यावरच सोडून द्यावं. मी देखील शाळेत बुरखा घालून जात नव्हती, ट्यूशनला जाताना केवळ घालत होती. जेव्हा मला वाटतं की आता मला बुरखा घालायला हवं मी निर्णय़ घेतला आणि पोशाख घालण्यास सुरुवात केली. हे ही वाचा- ‘‘हिजाबवर हात टाकणाऱ्यांचे हात कापून टाकू’’, महिला नेत्याचं वादग्रस्त विधान कुटुंबाकडून दबाव नाही, बऱ्याच काळापासून घालतोय हिजाब.. यापैकी एका बहिणीचं म्हणणं आहे की, कुटुंबाकडून आमच्यावर दबाव आणला जात नाही. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून माझी मोठी बहीण इस्लामिक नॉलेजचं शिक्षण घेत आहे. यादरम्यान तिला वाटलं आणि तिने हिजाब-बुरखा घालण्याच सुरुवात केली. खान सिस्टर्सचं म्हणणं आहे की, आता हिजाब वा बुरख्यात राहणं आम्हा बहिणींची ओळख झाली आहे. आम्हाला याचा आनंद आहे. इस्लाममध्ये महिलांना प्रेशियस डायमंड म्हणजेच अनमोल हिरा म्हटलं जातं. हिरा असाच उघडा ठेवू शकत नाही. या संदेशातून आम्ही प्रेरीत झालो. अनेक मुस्लीम महिला हिजाब-बुरखा घालत नाही, आता हा त्यांचा अधिकार आहे.
दरम्यान मध्य प्रदेशातील खान सिस्टर्सच्या व्हिडीओवर अनेकांनी टीका तर काहींनी समर्थनही केलं होतं. त्यात यापैकी एका बहिणीने फ्लाइंग किस दिलं होतं. यावरुनही गदारोळ झाला होता. दरम्यान या तरुणीने सांगितलं की, तिने समोरच्या बहिणीनी फ्लाइंग किस दिली होती.