अहमदाबाद , 27 नोव्हेंबर : गुजरात निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मात्र यंदाची निवडणूक भाजपसाठी वाटते तितकी सोपी नसणार आहे. कारण यावेळी अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आम आदमी पार्टी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आपने काँग्रेसला धोबीपछाड देत राज्यात एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर आता आपने गुजरात निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. तसेच ही निवडणूक आम्हीच जिंकणार असा दावा देखील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
कागदावर लिहून दिले अरविंद केजरीवाल यांची आज गुजरातमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचाच विजय होईल असा दावा केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये थेट कागदावर विजय होणार असल्याचं लिहून दिलं आहे. पंजाब निवडणुकीच्या प्रचारावेळी देखील अरविंद केजरीवाल यांनी अशाच पद्धतीने कागदावर लिहून दिले होते, आणि त्यांचा विजय देखील झाला होता. त्यामुळे आता भाजपाच टेन्शन वाढलं आहे. हेही वाचा : तर सर्वपक्षीय जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी कार्यक्रम ठेवू, सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा काय म्हणाले केजरीवाल ? अरविंद केजरीवाल यांनी या पत्रकार परिषदेमधून भाजपावर घणाघात केला आहे. गेले 27 वर्ष गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. मात्र यंदा भाजपाला दणका बसणार. रस्त्यावर कोणालाही विचारा ते म्हणतायेत की आपला मतदान करणार. यामुळे भाजपात घबराट पसरली आहे. गुजरात हे पहिलं राज्य आहे जिथे सामान्य माणूस मतदानाबाबत बोलायला घाबरतो. भाजपचे लोक आपल्याला मारतील याची त्यांना भीती वाटते असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे त्यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. काँग्रेसचा मतदार गुजरातमध्ये शोधूनही सापडणार नाही असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : ‘ शिवसेना हे शिवशंकरांवर नव्हे, तर शिवाजी महाराजांवर आधारित असलेलं नाव' भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्य आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील कोणत्याही परिस्थितीमध्ये गुजरातमध्ये सत्ता मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. तर दुसरीकडे आप देखील आता गुजरातमध्ये भाजपाच टेन्शन वाढवताना दिसत आहे.