JOIN US
मराठी बातम्या / देश / काश्मीरमधून मोठी बातमी, रेल्वे स्थानकाजवळ RPF जवानांवर दहशतवाद्यांचा हल्ला

काश्मीरमधून मोठी बातमी, रेल्वे स्थानकाजवळ RPF जवानांवर दहशतवाद्यांचा हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा हैदोस सुरुच आहे. पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा रेल्वे स्थानकाबाहेर चहा पीत असलेल्या दोन रेल्वे पोलिसांवर अतिरेक्यांनी गोळीबार केला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 18 एप्रिल : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) अतिरेक्यांचा (terrorist) हैदोस सुरुच आहे. काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात अतिरेक्यांनी सरपंचावर गोळीबार केल्याची बातमी ताजी असताना आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील काकापोरा (Kakapora) रेल्वे स्थानकाबाहेर चहा पीत असलेल्या दोन रेल्वे पोलिसांवर अतिरेक्यांनी गोळीबार (Terrorists fired upon RPF personnel) केला. या गोळीबारात दोन्ही आरपीएफ जवान गंभीररित्या जखमी (injured) झाले. एसआय देव राज आणि एचसी सुरिंदर अशी आरपीएफ जवानांची नावे आहेत. या जवानांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. संबंधित घटनेनंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस अतिरेक्यांचा शोध घेत आहेत. संबंधित हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्ल्यात दहशतवादी दिसत नसले तरी रेल्वे पोलिसांवर कशाप्रकारे हल्ला झाला ते अचूकपणे कैद झाला. दोन रेल्वे पोलीस चहा पीत बसले होते. त्यावेळी अचानक गोळीबाराचा आवाज आला. अचानक गोळीबाराचा आवाज येताच चहा पीत बसलेले पोलीस धास्तावले. पण त्यांना सावध होण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही. कारण तोपर्यंत एका पोलिसाला गोळी लागली आणि तो जमिनीवर कोसळला. तर दुसरा पोलीस कर्मचारी आपला जीव वाचविण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या दिशेला पळत सुटला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला आहे. घटना अतिशय थरारक होती. या घटनेत अतिरेक्यांनी एका रेल्वे पोलिसाचा जीव घेतला आहे.

दरम्यान, दक्षिण काश्मीर परिसरात अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पण तरीही या कारवाया कमी होताना दिसत नाहीय. अतिरेक्यांनी दोन दिवसांपूर्वीच बारामुल्ला जिल्ह्यात एका सरपंचाची गोळी झाडून हत्या केली होती. मनझुर अहमद बांगरु असं मृतक सरपंचांचं नाव होतं. अतिरेक्यांनी त्यांना एकटं साधत त्यांच्यावर गोळीबार केला. अतिरेक्यांच्या या गोळीबारात बांगरु गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं गेलं. पण रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याकडून अतिरेक्यांचा शोध सुरु आहे. ( मुलांच्या नावे गुंतवणूक करा, डबल फायदा मिळवा ) जम्मू-काश्मीरमधील त्याआधी आणखी एक अनपेक्षित आणि वाईट बातमी समोर आली होती. जवानांच्या गाडीचा अपघात झाल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला होता. तसेच पाच जवान गंभीर जखमी झाले होते. ही बातमी ताजी असताना आज अतिरेक्यांनी एका सरपंचावर गोळीबार केल्याची वाईट बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांता हैदौस सुरुच असतो. अतिरेक्यांकडून वारंवार काहीना काही कुरापत्या सुरुच असतात. शोपियानमध्ये काल सैनिकांच्या गाडीच्या झालेल्या भीषण अपघातामागे अतिरेकीच जबाबदार आहेत. शोपियानमध्ये अतिरेकी आणि भारतीय जवान यांच्यात चकमक सुरु होती. सैनिकांची गाडी चकमकीच्या ठिकाणीच जात होती. पण वातावरण खराब असल्यामुळे रस्ता ओला झाला होता. त्यामुळे रस्त्यावरुन गाडीचे चाक घसरले आणि मोठी दुर्घटना घडली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या