JOIN US
मराठी बातम्या / देश / कर्नाटक हिजाब वादात आता थेट अल-कायदाची उडी; अल-जवाहिरीने केलं मुस्कानचं कौतुक!

कर्नाटक हिजाब वादात आता थेट अल-कायदाची उडी; अल-जवाहिरीने केलं मुस्कानचं कौतुक!

कर्नाटकात सुरू झालेल्या आणि हळूहळू देशभर पसरलेल्या हिजाब वादाचे (Karnataka Hijab matter) पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले आहेत. जागतिक दहशतवादी संघटना असलेल्या अल-कायदानेही (Al queda Hijab matter) या वादात उडी घेतली आहे.

जाहिरात

ayman al zawahir

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 एप्रिल: कर्नाटकात सुरू झालेल्या आणि हळूहळू देशभर पसरलेल्या हिजाब वादाचे (Karnataka Hijab matter) पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले आहेत. जागतिक दहशतवादी संघटना असलेल्या अल-कायदानेही (Al queda Hijab matter) या वादात उडी घेतली आहे. अल कायदाचा नेता अयमान अल जवाहिरीने (Al Qaeda leader) कर्नाटकातली विद्यार्थिनी मुस्कान खान हिचं कौतुक केलं आहे. कोण आहे मुस्कान? हिजाब वाद सुरू झाल्यानंतर कर्नाटकातल्या मुस्कान खान (Karnataka Hijab girl) या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कॉलेजमध्ये हिजाब घालतेल्या मुलींसमोर ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देणाऱ्या तरुणांसमोर उभी राहून मुस्कानने ‘अल्लाह हू अकबर’ अशा घोषणा दिल्या होत्या. तिचा हा घोषणा देतानाचा व्हिडिओ (Hijab girl Muskan) सगळीकडे पसरला होता. हाच व्हिडिओ अल-कायदाचा नेता अल जवाहिरीनेही पाहिला. हिंदू उत्तराधिकार कायद्यात महिलांबाबत भेदभाव आहे का? सर्वोच्च न्यायालयाने मागितले केंद्राकडे उत्तर लादेनचा उत्तराधिकारी आहे जवाहिरी अल कायदा या दहशतवादी संघटनेमध्ये ओसामा बिन लादेनची (Osama bin Laden) जागा सध्या अल-जवाहिरी सांभाळत आहे. 2020 साली जवाहिरी ठार झाल्याचं वृत्त समोर आलं होतं; मात्र त्यानंतर काही महिन्यांनी समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे तो जिवंत असल्याचं स्पष्ट झालं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहिरी सध्या अफगाणिस्तानात लपला आहे. मुस्कानसाठी जवाहिरीने लिहिली कविता अल कायदाचे अधिकृत माध्यम असलेल्या शबाब मीडियाने प्रदर्शित केलेल्या एका व्हिडिओमध्ये अल जवाहिरी मुस्कानचं कौतुक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ SITE इंटेलिजन्स ग्रुपने व्हेरिफाय केला आहे. यात जवाहिरी म्हणतो, “सोशल मीडियावर मुस्कानचा व्हिडिओ (Karnataka Muskan Hijab video) पाहून मी अगदी प्रभावित झालो. त्यामुळे तिच्या कौतुकार्थ मी एक कविता लिहिण्याचा निर्णय घेतला.” यानंतर तो मुस्कानसाठीची कविता वाचतो. अल कायदाने हा व्हिडिओ ‘भारताची महान महिला’ (Al Qaeda poem for Muskan) अशा टायटलने शेअर केला आहे. लाइव्ह हिंदुस्तानने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पाकिस्तानवर टीका, भारतीयांना चिथावणी या व्हिडिओमध्ये अल-जवाहिरीने भारतातल्या मुस्लिमांना या ‘अत्याचारा’विरोधात प्रतिक्रिया देण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्याने पाकिस्तान, बांगलादेश आणि हिजाबवर निर्बंध लागू करणाऱ्या इतर देशांवर टीका केली. हे देश पाश्चिमात्य देशांचे साथीदार असल्याचा आरोप त्याने केला. दरम्यान, गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरनंतर जवाहिरीचा हा पहिलाच व्हिडिओ समोर आला आहे. जवाहिरी हा जगातल्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. त्याच्या या व्हिडिओमुळे तो केवळ जिवंत आहे एवढंच नव्हे, तर जगातल्या सर्व घडामोडींची खबरही ठेवतो आहे हे स्पष्ट झालं आहे. ही बाब नक्कीच चिंताजनक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या