JOIN US
मराठी बातम्या / देश / India@75: गोळ्यांनी छिन्नविछिन्न परमवीर संजयने जे केलं, ते पाहून शत्रुंनी सगळं सोडून काढला पळ

India@75: गोळ्यांनी छिन्नविछिन्न परमवीर संजयने जे केलं, ते पाहून शत्रुंनी सगळं सोडून काढला पळ

मी कारगिल.. आज तुम्हाला एका परमवीरची कहाणी सांगणार आहे, ज्याने गोळ्यांनी छिन्नविछिन्न होऊनही युद्धभूमीवरून परत येण्यास नकार दिला. अशा स्थितीत या महावीराने शत्रूच्या तीन सैनिकांना ठार करत विजयाचा झेंडा गाडला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या 75 वर्षात देशाला मोठं करण्यात अनेकांनी आपलं आयुष्य वेचलं आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या कित्येक जवानांनी प्राणाची आहुती दिली आहे. अशाच काही देशनायकांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मी कारगिल… ऑपरेशन विजय. ही गोष्ट आहे मे 1999 सालची. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या नापाक हेतूची भारतीय लष्कराला कल्पना आली होती. ती तारीख होती 3 मे, जेव्हा भारतीय लष्कराला जम्मू-काश्मीरच्या मैदानी भागात दहशतवाद्यांची चाहूल लागली. 26 मे 1999 रोजी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ सुरू केले. दहशतवाद्यांच्या वेषात असलेल्या पाकिस्तानी लष्कर-निमलष्करी दलाच्या जवानांना त्यांची योग्य जागा दाखवण्यासाठी मोहीम सुरू केली. ऑपरेशन विजयची सुरुवात भारतीय हवाई दलाने केली. अशक्यप्राय वाटणारा विजय शूर भारतीय सैन्याने प्रत्यक्षात साध्य केला. खरंतर, 13 जून 1999 रोजी टोलोलिंग परत घेऊन भारतीय लष्कराने कारगिल युद्धाची म्हणजेच ऑपरेशन विजयची भूमिका पूर्णपणे बदलली होती. टोलोलिंग ताब्यात घेतल्यानंतर, भारतीय सैन्याचे पुढील लक्ष्य पॉइंट्स 5140 आणि 4875 वर पुन्हा पकड मिळवणे हे होते. ही शिखरे काबीज केल्यावरच राष्ट्रीय महामार्ग वन अल्फावरून भारतीय लष्कराच्या साहित्याची आणि रसदाची सुरक्षित हालचाल शक्य होती. लक्ष्य पूर्ण करण्याची जबाबदारी 13 जम्मू-काश्मीर रायफल्सवर देण्यात आली होती. 13 J&K रायफल्सचे तत्कालीन कमांडिंग ऑफिसर, लेफ्टनंट कर्नल वायके जोशी यांच्याकडून आदेश मिळाल्यावर, भारतीय सैन्याच्या शूर सैनिकांची टीम त्यांच्या लक्ष्याकडे रवाना झाली. India@75: गोळ्यांचा वर्षाव होत असताना ग्रेनेड घेऊन शत्रुच्या तंबूत शिरला अन्.. असामान्य पराक्रमाची गाथा गोळ्या संपल्यावर उचलले हे धाडसी पाऊल… पॉइंट 4875 च्या सपाट शिखरावर विजय मिळवण्यासाठी, मेजर एसव्ही भास्कर यांच्या नेतृत्वाखालील कंपनी पूर्व उताराकडे आणि मेजर गुरप्रीत सिंग दक्षिण स्पूरच्या पश्चिम उताराकडे निघाले. मेजर गुरप्रीत सिंग यांनी एकाच वेळी फ्लॅट टॉप आणि उर्वरित सी कंपनीसोबत पॉईंट 4875 वर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. रायफलमॅन संजय कुमार आणि श्याम सिंग हे देखील पॉईंट 4875 च्या फ्लॅट टॉपवर हल्ला करणाऱ्या पथकातील प्रमुख स्काउट्समध्ये होते. शत्रूकडून प्रचंड गोळीबार होत असतानाही संजय कुमार आपल्या इतर 11 साथीदारांसोबत त्यांच्या लक्ष्याकडे वेगाने पुढे जात होते. रायफलमॅन संजय कुमार, त्यांच्या साथीदारांसोबत, पॉईंट 4875 च्या सपाट शिखराच्या अगदी जवळ पोहोचले होते, तेव्हा शत्रूने संगर (खंदक किंवा संरक्षणासाठी बनवलेली भिंत) पासून जोरदार गोळीबार केला. रायफलमन संजय कुमार आणि त्यांच्या साथीदारांनी वेळ न दवडता आपली पोझिशन घेतली आणि शत्रूंना चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. संगारमध्ये लपलेल्या शत्रूला उंचीचा फायदा मिळत होता. आतापर्यंत झालेल्या गोळीबारात रायफलमन संजयच्या दोन सहकाऱ्यांनी देशासाठी बलिदान दिले होते तर काही गोळ्या लागल्याने जखमी झाले होते. काही वेळाने रायफलमन संजयच्या गोळ्याही संपल्या. या कठीण काळात संजय कुमार यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेतला आणि शत्रूच्या दिशेने धाव घेतली. Women@75: समुद्र असो की आकाश, या महिलांसमोर सगळेच झुकतात; स्त्री म्हणून व्हायची हेटाळणी त्यामुळे रायफलमॅन संजयला मिळाला परमवीरचा सन्मान… आतापर्यंत शत्रूच्या तीन गोळ्या रायफलमन संजयच्या अंगात घुसल्या होत्या. रायफलमॅन संजयच्या पायात दोन गोळ्या लागल्या तर एक गोळी पाठीवर लागली. असे असतानाही रायफलमन संजय कुमार यांनी हिंमत न हारता संगरमध्ये प्रवेश केला. शत्रूवर तुटून पडले. या युद्धात त्यांनी शत्रूच्या तीन सैनिकांना ठार मारले. शत्रूचा एक संगर ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी शत्रूच्या दुसर्‍या संगरकडे आपला मोर्चा वळवला. त्याचवेळी अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या शत्रू सैनिकांनी संगर सोडून पळून जाण्यातच आपले हित मानले. शत्रूंनी यूनिवर्सल मशीनगन सोडून पळ काढला. रायफलमॅन संजयने याच मशीनगनच्या सहाय्याने उर्वरित लोकांचा नायनाट केला. रायफलमॅन संजय आतापर्यंतच्या लढाईत गंभीर जखमी झाला होता, तरीही त्याने युद्धभूमी सोडण्यास नकार दिला. रायफलमॅन संजयचे हे शौर्य पाहून सहकारी सैनिकांच्या अंगातही उर्जा संचारली. त्यांनी दुप्पट ताकदीने शत्रूवर हल्ला करण्यास सुरुवात केली. 4875 चा फ्लॅट टॉप शत्रू सैनिकांच्या तावडीतून पूर्णपणे मुक्त होईपर्यंत रायफलमन संजय कुमार आपल्या सहकारी सैनिकांसह लढले. अशा प्रकारे, रायफलमन संजय कुमार यांनी शत्रूचा सामना करताना असामान्य शौर्य, धैर्य आणि कर्तव्याप्रती असाधारण निष्ठा दाखवली. युद्धानंतर त्यांना परमवीर चक्र हा देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या