उत्तराखंड, 7 फेब्रुवारी : उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला आहे. या दुर्घटनेत अनेक लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भीषण घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून, यातून तेथील परिस्थिती किती गंभीर असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो.
धरणाच्या भीतीची काही भाग कोसळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नदीला महापूर आला असून गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.