झारखंड, 12 जुलै: झारखंडची राजधानी रांचीमध्ये (Ranchi) निष्काळजीपणाचे हद्दपार झाली आहे. आरोग्य प्रशासनाचा ढिसळ कारभार या घटनेवरुन उघड होत आहे. एका महिलेला कोरोना (Corona Vaccination) वॅक्सिनचा पहिला डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला होता. दरम्यान जेव्हा ही महिला दुसरा डोस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर गेली असता तिला कोवॅक्सिनचा (Covaxin) नाहीतर कोविशिल्डचा (Covishield) डोस दिला गेला. यानंतर महिलेची प्रकृती ढासळली. समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना रांचीच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बरियातू रोड (Bariatu Road) येथे घडली आहे. रांचीमधील शिवाजी नगर येथे राहणाऱ्या शीला देवी या लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी रांचीच्या बरियातू रोड येथील एडवांस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेल्या. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे या महिलेला कोव्हॅक्सिनऐवजी कोविशल्डची लस दिली गेली. ही लस घेतल्यानंतर लगेचच त्या महिलेची तब्येत ढासळली आणि त्यानंतर महिलेस तात्काळ अॅडव्हान्स डायग्नोस्टिक सेंटरने रांचीच्या मेडिका रुग्णालयात दाखल केले. हेही वाचा- पूल कोसळल्यानं अलिबाग-मुरुड वाहतूक विस्कळीत, भाजप आक्रमक या घटनेबद्दल बोलताना महिलेचा मुलगा चंदन यानं सांगितलं की, लस घेतल्यानंतर आईला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. यानंतर महिलेच्या कुटूंबियांनी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एकच गोंधळ घातला. कुटूंबियांनी घातलेल्या गोंधळाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीसीआर 9 च्या पोलिसांनी महिलेच्या कुटुंबियांना शांत करत परिस्थिती हाताळली.