नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : दहशतवाद्यांच्या कुरापती संपण्याचं नाव घेत नाहीत. दिवसेंदिवस जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती वाढत आहेत. सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. सोपोर भागात दहशतवाद्यांचा कट उधळला आहे. ४ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यातत आला आहे. या दहशतवाद्यांचा मोठा घातपाताचा कट असल्याचं यावरून समजत आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाने अलर्ट जारी केला आहे. हेही वाचा- ‘प्लिज लिफ्ट द्या’; सुनसान रस्त्यावर महिलेनं मागितली लिफ्ट अन्.., पुढे घडलं भयानक
हेही वाचा- क्वीन एलिझाबेथ यांचं निधन; सम्राज्ञीच्या सन्मानार्थ भारत सरकारचा मोठा निर्णय जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन जारी आहे. ४ दहशतवाद्यांसोबत मोठा शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला आहे. याआधी ATS ने पुण्यातून एकाला अटक केली होती. त्याने उत्तर भारतातील काही राज्य टार्गेटवर असल्याचं कबुल केलं होतं. त्यामुळे जवान आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे.