JOIN US
मराठी बातम्या / देश / चारित्र्यावर संशय घेतलाच आहे तर आता लग्न करणार! 25 वर्षांच्या संन्यासानंतर जैन मुनींचा फैसला

चारित्र्यावर संशय घेतलाच आहे तर आता लग्न करणार! 25 वर्षांच्या संन्यासानंतर जैन मुनींचा फैसला

25 वर्षांपूर्वी संन्यास घेतलेल्या एका जैन मुनींनी (Jain Muni) आपली साधना संपवून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश (marriage) करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 25 ऑगस्ट : 25 वर्षांपूर्वी संन्यास घेतलेल्या एका जैन मुनींनी (Jain Muni) आपली साधना संपवून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश (marriage) करण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या 6 दिवसांपूर्वी आश्रमात आलेल्या महिलेसोबत (woman) लग्न करून आपलं उरलेलं आयुष्य तिच्या सहवासात घालवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. आश्रमातील सहकाऱ्यांनी पसरवलेला गैरसमज (misunderstanding) आणि केलेली मारहाण (beating) यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं मुनी सुद्धांत सागर यांनी म्हटलं आहे. काय आहे प्रकरण? मध्यप्रदेशमधील दमोहच्या बेलाग्राम आश्रमात मुनी सुद्धात सागर हे गेल्या 25 वर्षांपासून वास्तव्य करतात. त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला असून ते सतत साधना करत असायचे. सहा दिवसांपूर्वी आश्रमात एक महिला राहायला आली होती. या महिलेसोबत मुनी सुद्धांत यांचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्यांचे गुरु सिद्धांत सागर आणि इतर सहकाऱ्यांनी केला, अशी तक्रार सुद्धांत सागर यांनी केली आहे. काय म्हणाले मुनी? काही दिवसांपूर्वी आश्रमात नव्याने दाखल झालेली महिला फोनवर बोलत होती. त्यावेळी तिच्यावर संशय घेत गुरु सिद्धांत सागर यांनी तिचा फोन काढून घेतला आणि तिला मारहाण केली. त्यांना रोखण्यासाठी आपण गेलो असता आपल्यालाही त्यांनी मारहाण केली. आसपासच्या इतर मुनींनाही त्यांनी बोलावलं आणि आपल्याला मारहाण करायला सांगितलं. त्यामुळे आपण तातडीने या महिलेसोबत बाहेर पडलो आणि पोलीस स्टेशन गाठलं, असं सुद्धांत सागर यांनी म्हटलं आहे. पोलीस स्टेशनमध्येच घेतला लग्नाचा निर्णय आपल्या चारित्र्यावर संशय घेतल्याने आपण संन्यासातून बाहेर पडून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करत असल्याचं मुनी सुद्धांत यांनी सांगितलं. पोलीस ठाण्यातच त्यांनी अंगावर पूर्ण कपडे चढवले आणि महिलेसोबत लग्न करण्यासाठी ते बाहेर पडले. हे वाचा - तालिबानच्या कुरापती सुरुच, अफगाण नागरिकांसाठी काबूल विमानतळाचे दरवाजे बंद आश्रमाने आरोप फेटाळले मुनी सुद्धांत सागर करत असलेले आरोप धादांत खोटे असून कुणीही त्यांना मारहाण केली नसल्याचं स्पष्टीकरण आश्रमाच्या वतीनं देण्यात आलं आहे. मुनी सुद्धांत सागर यांचे गेल्या 3 वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय आश्रम चालवणाऱ्या मुनी सिद्धांत सागर यांच्या पत्नीनं व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या