नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज आणखी एक भीम पराक्रम केला आहे. इस्रोने एकाच वेळी 9 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांमध्ये Oceansat-3 सह आठ छोट्या उपग्रहांचा समावेश आहे. यामध्ये एका भूतानच्या उपग्रहाचा देखील समावेश आहे. तामिळनाडूच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी 54/ ईओएस -06 मिशन अंतर्गत इस्रोकडून हे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. या वृत्ताला इस्रोकडून दुजोरा देण्यात आला आहे.
इस्रोच्या अध्यक्षांची माहिती याबाबत इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी माहिती दिली आहे. इस्रोने एकाच वेळी 9 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांमध्ये Oceansat-3 सह आठ छोट्या उपग्रहांचा समावेश असल्याचं सोमनाथ यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की आज 11 वाजून 56 मिनिटांनी ओशनसॅट-3 आणि आठ मिनी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत.