नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दाढीला (Beard) पाकिस्तान (Pakistan) घाबरल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियात (Social media) सुरू आहे. अशी चर्चा होण्यामागं नेमकं कारण काय आहे? नरेंद्र मोदींच्या दाढीला खरंच पाकिस्तान घाबरला का? असे अनेक प्रश्न भारतीय नेटकऱ्यांना पडले होते. याचं कारण आता समजलं आहे. पाकिस्तानातील एका टीव्ही कार्यक्रमांत नरेंद्र मोदीच्या दाढीबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यांनी दाढी का वाढवली याचं विश्लेषण पाकिस्तानस्थित एका तज्ज्ञाने केलं होतं.
खरंतर पाकिस्तानच्या निओ टीव्हीने हे चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्यामधील एका सहभागी व्यक्तीने नरेंद्र मोदींच्या दाढीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढीशी केली आहे. सध्या भारतावरील शनिचा आणि गुरुचा प्रकोप दूर करण्यासाठी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदींनी दाढी वाढवल्याचा दावाही जीओ टीव्हीवरील या व्यक्तीने केला आहे.
हे ही वाचा- 1 एप्रिलपासून सर्व ट्रेन्स सुरू होणार? रेल्वे प्रशासनानं नेमकं काय सांगितलं वाचा पाकिस्तानी माध्यमांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. तसेच या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा विस्तार करताना, आपली व्याप्ती काबुलपर्यंत विस्तारली होती. या पार्श्वभूमीवर अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदींनी दाढी वाढवली असल्याचा दावाही या वृत्तवाहिनीवर करण्यात आला आहे. याशिवाय त्यांनी मुरली मनोहर जोशी हे ज्योतिषशास्त्राचे जाणकार असल्याचंही म्हटलं आहे. मुरली मनोहर जोशींच्या सांगण्यावरुनच नरेंद्र मोदींनी दाढी वाढवली असल्याचा अजब दावाही जीओ टीव्हीवर करण्यात आला आहे.