JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / ताजमहालप्रमाणे आहे Microsoft च्या नव्या ऑफिसचा लुक; पाहा Inside Photo

ताजमहालप्रमाणे आहे Microsoft च्या नव्या ऑफिसचा लुक; पाहा Inside Photo

मायक्रोसॉफ्टचं डेव्हलपमेंट सेंटर यूपीच्या नोएडामध्ये एका सहा मजली इमारतीमध्ये, शेवटच्या तीन मजल्यांवर आहे. हे ऑफिस संगमरवर, जबरदस्त कलर पॅलेट आणि डिझाईनद्वारे ताजमहालच्या कलाकुसरीची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

0106

मायक्रोसॉफ्टने दिल्ली-एनसीआर नोएडामध्ये आपल्या नव्या इंडिया डेव्हलपमेंट सेंटर (IDC) फॅसिलिटीची सुरुवात केली आहे. ताजमहालच्या धर्तीवर मायक्रोसॉफ्टने हे ऑफिस तयार केलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे नवं केंद्र इंजिनियर्ससाठी जागतिक आणि भारतात युजर्ससाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान डिझाईन करण्यासाठी प्रीमियर हब म्हणून काम करेल. हैदराबाद आणि बेंगळुरूनंतर नोएडातील भारतातील हे तिसरं सेंटर आहे.

जाहिरात
0206

मायक्रोसॉफ्टच्या या सेंटरमध्ये घुमटाकार दरवाजे, संगमरवरीचे घुमट आहेत. याद्वारे कंपनीने देशातील एका समृद्ध शिल्प कौशल्याचा सन्मान केला आहे. तसंच या ऑफिसमध्ये मुघल काळातील नक्षीसह जाळीदार घुमटाकार छतही करण्यात आलं आहे.

जाहिरात
0306

मायक्रोसॉफ्टचं हे ऑफिस घुमट, विशिष्ट कलर पॅलेट आणि डिझाईनद्वारे ताजमहालाच्या कलाकुसरीची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

जाहिरात
0406

Microsoft ने दिलेल्या माहितीनुसार, आर्किटेक्ट्सने ताजमहालप्रमाणेच, या ऑफिसमध्ये शेवरॉन पॅटर्न तयार केला आहे. यासाठी वापरल्या गेलेल्या संगमरवराची खरेदी भारतातूनच केली गेली आहे.

जाहिरात
0506

ऑफिसमध्ये बिल गेट्स यांचा एक जाळीदार फोटोही तयार करण्यात आला आहे. फ्लोरल आयकनोग्राफीवर वायफाय आणि सेटिंग्जची चिन्ह तयार करण्यात आली आहेत.

जाहिरात
0606

ऑफिसमधील वर्कस्पेस ताजमहालच्या बाग-बगिच्यापासून प्रेरित आहे. जमिनीवर गार्डनप्रमाणे डिझाईन तयार करण्यात आलं आहे. (सर्व फोटो मायक्रोसॉफ्ट)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या