भारताच्या 2018 मधील वाघांच्या जनगणनेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे
भारताच्या 2018 मधील वाघांच्या जनगणनेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. (फोटो सौजन्य- Twitter @PrakashJavadekar)
भारताचे नाव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. वाघांची देशभरातील संख्या सर्वात मोठा कॅमेरा ट्रॅप वन्यजीव सर्वेक्षण केल्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पोहोचली आहे.
एकूण 139 स्टडी साइट्सवर 26,760 वेगवेगळ्या ठिकाणी पेअर्ड कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले होते. यामधून अंदाजे 35 दशलक्ष फोटो काढले आहेत.
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी ट्विटरवर अशी माहिती दिली की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारताने #SankalpSeSiddhi च्या माध्यमातून 4 वर्षांपूर्वी वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे.'
आतापर्यंत केलेल्या वन्यजीवनाच्या सर्वेक्षणानुसार देशातील वाघांची संख्या 6 टक्क्यांनी वाढून अंदाजे 3,000 प्राण्यांवर पोहोचली आहे.
भारतातील वार्षिक व्याघ्रगणनेनुसार यापैकी अर्ध्याहून जास्त वाघ हे मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यामध्ये आहेत
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला हे पाहण्याकरता अर्ज पाठवण्यात आला होता की, जगात कुठेही एवढे मोठे वन्यजीव सर्वेक्षण केले गेले आहे का