JOIN US
मराठी बातम्या / देश / रेल्वे तुम्हाला देणार 10 हजार रुपये! करावं लागणार फक्त हे काम

रेल्वे तुम्हाला देणार 10 हजार रुपये! करावं लागणार फक्त हे काम

आपण नेहमीच विविध कारणांसाठी प्रवास (Travel) करत असतो. काही वेळा हा प्रवास लांबचा असतो किंवा जवळचा. प्रवासात आपल्याला अनेकविध अनुभव येत असतात. यापैकी काही अनुभव समृद्ध करणारे, तर काही त्रासदायकदेखील असतात. आपल्या देशात वाहतुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, लांबचा प्रवास म्हटलं, की आजही बहुतांश जण रेल्वेला (Indian Railway) प्राधान्य देतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून : आपण नेहमीच विविध कारणांसाठी प्रवास (Travel) करत असतो. काही वेळा हा प्रवास लांबचा असतो किंवा जवळचा. प्रवासात आपल्याला अनेकविध अनुभव येत असतात. यापैकी काही अनुभव समृद्ध करणारे, तर काही त्रासदायकदेखील असतात. आपल्या देशात वाहतुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, लांबचा प्रवास म्हटलं, की आजही बहुतांश जण रेल्वेला (Indian Railway) प्राधान्य देतात. देशभरात रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारलं आहे. रेल्वे प्रवासादरम्यान आपल्याला अनेक रोमांचक अनुभव (Experience) येत असतात. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयानं (Ministry Of Railway) देशातल्या सर्व नागरिकांसाठी एका खास उपक्रमाचं आयोजन केलं आहे. रेल्वे मंत्रालय नागरिकांसाठी एक स्पर्धा (Competition) आयोजित करत आहे. या स्पर्धेत नागरिकांना त्यांच्या रेल्वे प्रवासाविषयी एक ट्रॅव्हलॉग (Travelog) लिहायचा आहे. हा ट्रॅव्हलॉग हिंदी भाषेतच लिहावा लागणार आहे. सर्वोत्तम ट्रॅव्हलॉग लिहिणाऱ्या विजेत्याला रेल्वे मंत्रालयाकडून 10 हजार रुपयांपर्यंत बक्षीस आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे. देशातल्या सर्व नागरिकांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून हिंदी भाषेत रेल्वे प्रवासवर्णन स्पर्धा (Railway Travelogue Competition) आयोजित करण्यात आली आहे. यात नागरिकांनी त्यांच्या रेल्वे प्रवासाविषयी ट्रॅव्हलॉग म्हणजेच प्रवासवर्णन लिहायचं आहे. सर्वोत्तम प्रवासवर्णन लिहिणाऱ्यास 10 हजार रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासवर्णन स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपला लेख 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सहायक निदेशक, हिंदी (प्रशिक्षण), खोली क्र. 536-डी, रेल्वे मंत्रालय, रायसीना रोड, नवी दिल्ली -110001 या पत्त्यावर पाठवावा. या स्पर्धेंतर्गत ट्रॅव्हलॉग अर्थात प्रवासवर्णन पाठवण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं काही नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार, रेल्वे प्रवासवर्णन हे फक्त हिंदी भाषेतच (Hindi Language) असावं. हा लेख किमान 3000 ते कमाल 3500 शब्दांपर्यंत असावा. लेख टाइप केलेला असावा. तसंच चारही बाजूंनी एक इंचाची जागा सोडलेली असावी. त्यावर शब्दसंख्या नमूद केलेली असावी. स्पर्धकानं लेखाच्या सुरुवातीला ठळक अक्षरात स्वतःचं पूर्ण नाव, वय आणि पत्ता लिहिलेला असावा. याशिवाय स्पर्धकाची मातृभाषा, मोबाइल क्रमांक आणि ई-मेल यांचाही उल्लेख लेखावर असावा. रेल्वे प्रवासवर्णन हे स्वतःचे अर्थात मूळ स्वरूपात असावं. ते केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे पुरस्कृत नसावं. तसंच स्पर्धकाने याबाबतचं प्रमाणपत्र सोबत जोडावं. रेल्वे मंत्रालयानं आयोजित केलेल्या या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या स्पर्धकांना पारितोषिकं देऊन गौरविण्यात येईल. तसंच याव्यतिरिक्त पाच स्पर्धकांना प्रेरणा पुरस्कारानं गौरवण्यात येईल. या स्पर्धेत एकूण आठ व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. प्रथम पुरस्काराचं स्वरूप 10 हजार रुपये आणि प्रशस्तिपत्रक, द्वितीय पुरस्काराचं स्वरूप 8 हजार रुपये आणि प्रशस्तिपत्रक, तर तृतीय पुरस्काराचं स्वरूप 6 हजार रुपये आणि प्रशस्तिपत्रक असं आहे. याशिवाय प्रेरणा पुरस्कार विजेत्यांना 4 हजार रुपये आणि प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात येईल. याबाबत पूर्व-मध्य रेल्वेचे सीपीआरओ वीरेंद्र कुमार म्हणाले, `रेल्वे मंत्रालय सर्व नागरिकांसाठी हिंदी भाषेत रेल्वे प्रवासवर्णन स्पर्धा आयोजित करत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासादरम्यान आलेला अनुभव जाणून घेणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या आधारे रेल्वेच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आणि त्यात हिंदीचा वापर वाढवण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर रेल्वे प्रवासवर्णन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेंतर्गत रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रवाशांकडून रेल्वे प्रवासासंबंधीचे हिंदी भाषेत लिहिलेले अनुभव मागवण्यात आले आहेत. हे अनुभव प्रवासवर्णन स्वरूपात असावेत.`

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या