राजकोट, 17 सप्टेंबर: गुजरातमधील राजकोट इथला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हेल्मेटचे नियम काटेकोरपणे पाळले जात असतानाही एका व्यक्तीनं स्टीलचं पातेल हेल्मेट म्हणून डोक्याला बांधून गाडी चालवल्याचा अजब प्रकार समोर आला. हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी त्यानं स्टीलचं पातेलं डोक्यावर हेल्मेट म्हणून लावलं आहे.