नवी दिल्ली, 30 मे: पीएनबी बँक (PNB Scam) घोटाळ्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) ला मंगळवारी डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (Criminal Investigation Department) अटक केली. त्यानंतर मेहुल चोक्सी सध्या डोमिनिकाच्या तुरुंगात आहे. सुरुवातीला डोमिनिका सरकार मेहुल चोक्सीला भारतात सोपणवार असं सांगितलं होतं. मात्र दोन दिवसांपूर्वीच झालेल्या सुनावणीत डोमिनिका सरकारनं आपला निर्णय बदलला. मेहुल चोक्सीला पुन्हा डोमिनिका सरकार अँटिग्वाकडे (Antigua) सोपवण्यात येणार आहे. दरम्यान मेहुल चोक्सीला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न सुरु केलेत. भारतातून फरार झालेल्या मेहुल चोक्सीला पुन्हा देशात आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरु केले आहेत. भारतानं एक विशेष विमान डोमिनिकाला पाठवलं आहे. अँटिग्वाच्या पंतप्रधानांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
27 मे रोजी हे प्रायव्हेट जेट डोहा- भारत- मेड्रिड अशा मार्गानं डोमिनिका येथील डगलस चार्ल्स विमानतळावर पोहोचलं. भारतानं पाठवलेलं बॉम्बार्डियर ग्लोबल 5000 हे प्रायव्हेट जेट अजूनही विमानतळावर आहे. हेही वाचा- मोठी बातमी: मेहुल चोक्सीचा डोमिनिकाच्या तुरुंगातला EXCLUSIVE फोटो भारतानं पाठवले महत्त्वाचे कागदपत्र या विमानातून भारतानं मेहुल चोक्सीशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे पाठविली आहेत. जी न्यायालयात हजर केली जातील. कागदपत्रांच्या माध्यमातून हे सिद्ध केले जाईल की चोक्सी हा फरारी आहे. मेहुल चोक्सी प्रकरणी डोमिनिका न्यायालयात पुढील सुनावणी 2 जून रोजी होणार आहे. मेहुल चोक्सीचा तुरुंगातला पहिला फोटो मेहुल चोक्सीचा डोमिनिका तुरुंगातला त्याचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये चोक्सीच्या हातावर मारहाणीचा खुणा दिसून येत आहे. मेहुल चोक्सीचा तुरुंगातील फोटो समोर आला आहे. तर दुसऱ्या फोटोत त्याच्या हातावर मारहाणीच्या खुणाही दिसत आहे.
वकिलांनी केला होता मारहाणीचा दावा मेहुल चोक्सीला जबरदस्तीनं डोमिनिका येथे नेण्यात आल्याचं त्याच्या वकिलानं म्हटलं. तसंच चोक्सीच्या शरीरावर काही खुणा आहेत, असा दावाही त्याच्या वकिलांनी गुरुवारी केला होता. अगरवाल यांनी आरोप केला होता की चोक्सीच्या शरीरावर ‘अत्याचाराच्या खुणा’ आहेत. त्यानंतर डोमिनिका येथील चोक्सीचे वकील वेन मार्श यांनी या वृत्ताला दुजोरा दिला होता. त्यांनी शरीरावर असलेल्या खुणांची स्पष्टता केली. चोक्सी यांचे डोळे सुजलेले आणि शरीरावर काही ठिकाणा खुणा दिसल्याचं मार्श यांनी सांगितलं. दरम्यान समोर आलेल्या फोटोंमध्ये त्याच्या हातावर खुणा आणि त्याचे डोळेही सुजलेले दिसत आहेत.