नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवाद जो बायडेन (Joe Biden) यांना विजय मिळाला आहे. बायडेन हे अमेरिकेचे नवे राष्ट्रपती होतील. बायडेन यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सह अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, भारतातही एका जो बायडेनची गरज आहे. अपेक्षा आहे की 2024 मध्ये असा नेता मिळेल. दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, सर्व अमेरिकन मतदारांना बायडेन यांची निवड केल्यामुळे शुभेच्छा. बायडेन हे अमेरिकेला एकजूट करतील आणि आपल्या आधीच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे देशाचं विभाजन करणार नाही. ते पुढे म्हणाले की, आता भारतातही एक जो बायडेनची गरज आहे. आशा आहे की 2024 मध्ये भारतालाही असा नेता मिळेल. पार्टीशी संंबंध असतानाही भारतीयांचा हाच प्रयत्न असायला हवा. भारतात विभाजन करणाऱ्या शक्तींना अपयशी करायला हवं.
आपण पहिल्यांदा एक भारतीय आहोत. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी शनिवारी रिपब्लिकन पक्षाचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांना हरवलं. 77 वर्षीय माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती होतील. बायडेन यांना 270 हून अधिक इलेक्ट्रोरल कॉलेजचे वोट मिळाले आहेत.