नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत सुरू असलेला आपला कार्यक्रम अर्ध्यावरच सोडला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवरच एका महत्त्वाच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी आपला कार्यक्रम सोडून गेल्याची माहिती आहे. दरम्यान, ‘आम्ही भारताच्या 2 वैमानिकांना अटक केली आहे. त्यातल्या एका जणाला रुग्णालयात दाखल केलं आहे,’ असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून सकाळपासून अनेक दावे करण्यात आले आहेत. आम्ही भारताची दोन विमान पाडली, असंही पाकिस्तानने आधी म्हटलं आहे.