JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / परदेशी सौंदर्याचं कौतुक करा! पण आपला देश एका परक्याच्या नजरेतून बघा एकदा, नव्याने पडाल प्रेमात

परदेशी सौंदर्याचं कौतुक करा! पण आपला देश एका परक्याच्या नजरेतून बघा एकदा, नव्याने पडाल प्रेमात

आपल्या देशाचं नैसर्गिक सौंदर्य कोणापासून लपलेलं नाही. भारताच्या भूमीवर उत्तरेकडून दक्षिण आणि पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत अनेक सुंदर नैसर्गिक रंग विखुरलेले आहेत. नॉर्वेजियन डिप्लोमॅट एरिक सोल्हेम (Erik Solheim) यांच्या नजरेतून भारत किती सुंदर आहे, हे त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलं आहे. खरं तर, नॉर्वे हा जगातला सर्वांत सुंदर देश मानला जातो. पण एरिक भारताच्या विविध भागांची सुंदर छायाचित्रं पोस्ट करत असतात. चला तर मग, त्याच्या दृष्टिकोनातून पाहूया, अविश्वसनीय भारताची छायाचित्रे.

0106

अलीकडेच एरिक सोल्हेम यांनी त्याच्या ट्विटरवरून उत्तराखंड या अतिशय सुंदर राज्याचं एक सुंदर छायाचित्र शेअर केलं आहे. हा फोटो पौरी, गढवालचा आहे. चित्रात हा परिसर खरोखरच स्वर्गासारखा सुंदर दिसत आहे. या फोटोला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जाहिरात
0206

याआधी त्यांनी हिमाचल प्रदेशातील शिमलाचा ​​एक सुंदर फोटो शेअर केला होता. त्यांनी या फोटोसोबत लिहिलं की, हे युरोपमधील शहर नसून सुंदर आणि हिरवाईने भरलेल्या शिमल्याचा फोटो आहे. हा फोटो लोकांना खूप आवडला.

जाहिरात
0306

एरिक सोल्हेम यांनी यापूर्वी उत्तराखंडमधील नैनितालचा फोटो शेअर केला होता. हा फोटो रात्री खूप उंचावरून घेतला होता आणि तलावाच्या काठावर चमकणाऱ्या नैनितालचं दृश्य असं दिसत होतं की, जणू काही जमिनीवर तारेच विखुरले आहेत.

जाहिरात
0406

एरिक यांनी शेअर केलेला तामिळनाडूचा फोटोही पाहण्यासारखा आहे. त्यांच्या वर्णनानुसार, हे ठिकाण कोली हिल्स आहेत, जे तामिळनाडूच्या नमक्कल येथे आहेत. इथले डोंगरावर बांधलेले नागमोडी वळणावळणांचे रस्ते हेअरपिनसारखे सुंदर दिसतात.

जाहिरात
0506

नॉर्वेजियन डिप्लोमॅटने दक्षिणेकडील सुंदर मंदिर देखील पाहिलं आणि त्याचा फोटो शेअर केला. भारतात 1800 वर्षांपूर्वी 3D उत्कृष्ट कृती होत्या असं त्यांनी म्हटलंय. हा फोटो तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील जंबुकेश्वर मंदिराचा आहे.

जाहिरात
0606

याशिवाय एरिक यांनी राजस्थानचा एक सुंदर फोटो शेअर करताना या राज्याचंही वर्णन केलं आहे. भारतातील लोकांना त्यांची पोस्ट आवडलीच आहे. शिवाय, भारतीय पर्यटनाला चालना देण्याच्या त्यांच्या पद्धतीचं कौतुकही केलं जात आहे. (All Photos Credit- Twitter/Erik Solheim)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या