पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने असं सांगितलं की, बाबरी मशिदीचा विध्यंस केल्यानंतर भाजपच्या पुढाकाराने संप्रदायांमध्ये हिंसा भडकली, ज्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला. जर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत न्यायाचा जरा तरी विचार केला असता तर या चुकीच्या कृत्याबाबत सार्वजनिक रुपात असे काम करणाऱ्यांची सुटका केली नसती.
काय आहे बाबरी प्रकरण? - 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येतली बाबरी मशिद पाडली - बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्याची सीबीआयची मागणी - बाबरी पाडल्यानंतर 2 एफआयआर दाखल केले, लखनौ आणि फैजाबादमध्ये - फैजाबादचा खटला रायबरेलीकडे वर्ग केला त्यात 8 भाजप नेत्यांवर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप - आरोपी : अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती अशा नेत्यांचा समावेश - भाजप नेत्यांनी कट रचल्याचा सीबीआयचा दावा, पुरावेही, आरोपपत्रही दाखल खटल्याचं महत्त्व का आहे? - अडवाणी, जोशी, उमा भारती यांच्यावर आता खटला चालणार, राजकीयदृष्ट्या भाजपची अडचण - अडवाणींवर खटला चालणार त्यामुळे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांची अडचण - उमा भारती ह्या सध्या मोदी मंत्रिमंडळात मंत्री, त्यांच्यावरही खटल्यामुळे टांगती तलवार - खटल्याचा निकाल दोन वर्षात लागणार तोपर्यंत अडवाणींचं राजकीय भवितव्यही टांगणीला - मुरली मनोहर जोशींचं राजकीय भवितव्यही टांगणीला, सध्या फक्त खासदार - जोशी, उमा भारती हे अडवाणी कँपचे मानले जातात. आता त्यांना मोदींना विरोध करणं अवघड - भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवरच रोज सुनावणी होणार. त्यामुळे काँग्रेससह विरोधकांना आयतं कोलीत