JOIN US
मराठी बातम्या / देश / जातीवरून भेदभाव झाल्याचा आरोप करत प्राध्यापकाचा राजीनामा, देशातील नामांकित संस्थेतील घटना

जातीवरून भेदभाव झाल्याचा आरोप करत प्राध्यापकाचा राजीनामा, देशातील नामांकित संस्थेतील घटना

आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतातली आघाडीची इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट अशी ओळख असलेल्या चेन्नईमधल्या मद्रास IIT मध्ये (Indian Institute of Technology, Madras) जातीआधारित भेदभाव (Caste Discrimination) अनुभवायला मिळाल्याची तक्रार एका प्राध्यापकाने केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 02 जुलै: आपण 21व्या शतकात, विज्ञान युगात जगतो आहोत. माणसाने समुद्रतळापासून अवकाशस्थ ग्रहांपर्यंत सर्वत्र आपल्या प्रगतीचा डंका वाजवला आहे. हे सगळं केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर साध्य झालं आहे. पूर्वीच्या काळी असलेले जातिभेद, वंशभेद, वर्णभेदासारखे अवमानकारक आणि मागास विचार टाकून आपण पुढे आलो आहोत. असं असलं तरीही अजूनही अनेक ठिकाणी अशा प्रकारचे भेदभाव अस्तित्वात आहेत आणि अनेकांना त्याचा दुर्दैवी अनुभव घ्यावा लागतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतातली आघाडीची इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट अशी ओळख असलेल्या चेन्नईमधल्या मद्रास IIT मध्ये (Indian Institute of Technology, Madras) जातीआधारित भेदभाव (Caste Discrimination) अनुभवायला मिळाल्याची तक्रार एका प्राध्यापकाने केली आहे. हे कारण देऊन त्या प्राध्यापकाने राजीनामा दिला आहे. आणखी एक विरोधाभासात्मक योगायोग म्हणजे हे प्राध्यापक मानव्यवाद आणि सामाजिक शास्त्र (Department of Humanities & Social Sciences) या विभागात कार्यरत होते. हे वाचा- भाजप आमदाराला जुगार खेळताना रंगेहाथ पकडलं; 25 जणांना अटक, 7 तरुणींचा समावेश आपल्या राजीनाम्यात त्या प्राध्यापकांनी लिहिलं आहे, ‘सर्वत्र असा एक समज आहे, की मागास जातींबद्दल भेदभाव केल्या जाण्याच्या घटना अलीकडे अत्यंत दुर्मीळ झाल्या आहेत; मात्र मी या संस्थेत प्रत्यक्षात पाहिलं ते यापेक्षा किती तरी वेगळं आहे. मला स्वतःला तर असा अनुभव आलाच; पण या संस्थेत कार्यरत असलेल्या SC (Scheduled Castes) आणि OBC (Other Backward Classes) अर्थात अनुसूचित जाती आणि इतर मागास वर्गातल्या कर्मचाऱ्यांशी या विषयासंदर्भात संवाद साधल्यावर असं लक्षात आलं, की जातिभेद किंवा भेदभाव होत नसल्याचा जो समज आहे, तो चुकीचा आहे. असे प्रकार इथे वारंवार अनुभवायला मिळत आहेत.’ आपण या प्रकारांविरोधात योग्य ती कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्या प्राध्यापकांनी सांगितलं आहे. दरम्यान, IIT कडून यावर आत्ता कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार देण्यात आला आहे. ‘संस्थेचे कर्मचारी किंवा विद्यार्थी यांच्याकडून आलेल्या कोणत्याही तक्रारीचं निवारण तातडीने केलं जातं. त्यासाठी तक्रार निवारणाची एक प्रक्रिया निश्चित करण्यात आलेली आहे,’ असं संस्थेकडून सांगण्यात आलं. हे वाचा- मराठा आरक्षण: पुनर्विचार याचिका SCने फेटाळल्यानंतर संभाजीराजे म्हणाले… मद्रासच्या IIT या संस्थेमध्ये असे प्रकार यापूर्वीही घडले असून, संस्थेकडे अशी तक्रार दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतल्या व्यक्तींसह सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या समूहांकडून या संस्थेतला भेदभाव नष्ट करण्याची मागणी वारंवार केली जाते. यापूर्वी संस्थेच्या आवारात एका मुलीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी मानव्यवाद आणि विज्ञान या विभागातल्या एका प्राध्यापकांची चौकशीही करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या