JOIN US
मराठी बातम्या / देश / BREAKING : प्रशांत किशोर काँग्रेसच्या उंबरठ्यावरून माघारी परतले, सोनिया गांधींची ऑफर नाकारली

BREAKING : प्रशांत किशोर काँग्रेसच्या उंबरठ्यावरून माघारी परतले, सोनिया गांधींची ऑफर नाकारली

गेल्या आठवड्याभरापासून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 एप्रिल : गेल्या आठवड्याभरापासून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेला आता दस्तरखुद्द प्रशांत किशोर यांनीच पूर्णविराम दिला आहे. आपण काँग्रेसमध्ये (congress) प्रवेश करणार नसल्याची घोषणाच प्रशांत किशोर यांनी केली आहे. (Prashant Kishor declines offer to join Congress) प्रशांत किशोर अखेरीस काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाबद्दल उलटसुलट चर्चा रंगली होती. काँग्रेसमध्येही यावर जोर बैठका घेण्यात आल्या होत्या. पण, आज प्रशांत किशोर यांनी फेसबुक पोस्ट शेअर करून आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

मी  काँग्रेस पक्षात सामील होण्यासाठी आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची कॉंग्रेसची ऑफर नाकारली आहे. माझ्या मतानुसार, परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा अधिक  चांगल्या नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे, असं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या