JOIN US
मराठी बातम्या / देश / Voting Card: मतदानकार्ड नसलं तरीही करू शकता वोटींग; मतदान केंद्रावर दाखवा ‘ही’ कागदपत्रे

Voting Card: मतदानकार्ड नसलं तरीही करू शकता वोटींग; मतदान केंद्रावर दाखवा ‘ही’ कागदपत्रे

Voting without Voter ID: मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशा सर्व मार्गांबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हीही तुमचं बहुमूल्य मत अगदी सहजतेने करू शकाल.

जाहिरात

Voting Card: मतदानकार्ड नसलं तरीही करू शकता वोटींग; मतदान केंद्रावर दाखवा ‘ही’ कागदपत्रे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जुलै: भारत हे जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांकडून चालवलेलं राज्य होय. अर्थातच लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत देशाचा गाढा हाकला जातो आणि हे लोकप्रतिनिधी निवडले जातात, मतदानाच्या माध्यमातून..भारतातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा इत्यादीसाठी मतदान होतं आणि लोक योग्य उमेदवाराला मतदान करतात. हे मतदान करण्यासाठी मतदानकार्ड आवश्यक असते. मतदानकार्डावरून तुम्हाला मतदानाची परवानगी दिली जाते. परंतु निवडणुकीपूर्वी तुमचे मतदार कार्ड (Voter ID) हरवले किंवा खराब झाले असेल तर? तुमचे मतदार कार्ड (Voting card)  हरवले किंवा खराब झाले असेल तर काळजी करण्याची गरज नाही, आज आम्ही तुम्हाला असे सर्व मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हीही तुमचे अमुल्य मत (Voting without Voting Card) सहजपणे देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया.. जर तुमचं मतदानकार्ड हरवलं असेल किंवा खराब झालं असेल, तर मतदान केंद्रावर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रांसह 11 कागदपत्रे दाखवून तुम्ही मतदान केंद्रावर तुमची ओळख पटवून देऊ शकता. परंतु यासाठी तुम्हाला प्रथम मतदार यादीत तुमचं नाव तपासावं लागेल. मतदान यादीत नाव असेल तरच तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येईल. म्हणून तुमचे नाव मतदान यादीत आहे की नाही हे तपासून घ्या.  हेही वाचा:  Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते महत्त्वपूर्ण माहिती जर तुमचे नाव मतदार यादीत असेल आणि तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तर भारत निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, ओळखपत्र म्हणून ओळखले जाणारे ही सरकारी कागदपत्रे दाखवून तुम्ही मतदान करू शकता. पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, जर तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी असाल तर तुम्ही कंपनी आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड, पोस्ट ऑफिस किंवा बँकेने जारी केलेले पासबुक, मनरेगा द्वारे जारी केलेले अधिकृत ओळखपत्र या आधारे देखील मतदान करू शकता. कार्ड, एनपीआर किंवा खासदार किंवा आमदार यांच्याकडून दिलं गेलंलं अधिकृत ओळखपत्र दाखवून तुम्ही मतदान करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या