JOIN US
मराठी बातम्या / देश / पाकिस्तानी महिलेनं लिपिकाला अडकवलं हनी ट्रॅपमध्ये, ‘सोना’ ‘बाबू’ म्हणत घेतली गुप्त माहिती

पाकिस्तानी महिलेनं लिपिकाला अडकवलं हनी ट्रॅपमध्ये, ‘सोना’ ‘बाबू’ म्हणत घेतली गुप्त माहिती

‘सोना’ ‘बाबू’ म्हणत हनी ट्रॅपमध्ये अडकवलं आणि नंतर प्रेम आणि पैशांचं आमिष दाखवून त्याच्याकडून व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलद्वारे बरीच गुप्त माहिती घेतली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 डिसेंबर : पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेतल्या एका महिलेने रजिस्ट्री कार्यालयात काम करणाऱ्या एका लिपिकाला हनी ट्रॅपमध्ये गुंतवून त्याच्याकडून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी गोपनीय माहिती मिळवण्यास सुरुवात केली होती. बिहारमधल्या मुझफ्फरपूरमधल्या संबंधित लिपिकाला पोलिसांनी अटक केली आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बिहारमधल्या मुझफ्फरपूरमधल्या रजिस्ट्री कार्यालयात कार्यरत असलेल्या एका लिपिकाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम आणि पैशाच्या लालसेपोटी आरोपी देशाची गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयच्या महिला एजंटला देत होता. पोलिसांनी आरोपीच्या मोबाइलमधून अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो जप्त केले आहेत. रवी चौरसिया असं आरोपीचं नाव असून तो मुंगेर जिल्ह्यातल्या पूर्व जमालपूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विषहरी गावातला रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध ऑफिशियल सीक्रसी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हेही वाचा :  कोण आहेत 33 वर्षीय बिलावल भुट्टो झरदारी? PM मोदींवर टीका केल्याने आले चर्चेत; यापूर्वीही वादग्रस्त विधाने

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी चौरसिया हा मुझफ्फरपूरमधल्या कटरा रजिस्ट्री ऑफिसमध्ये लिपिक म्हणून काम करत होता. त्यापूर्वी त्याने अवाडी चेन्नई (संरक्षण मंत्रालय) इथे लिपिक पदावर काम केलं होतं. त्याला आयएसआयच्या महिला एजंटने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं आणि प्रेम व पैशांची लालूच दाखवून त्याच्याकडून देशाची गोपनीय माहिती ती घेत राहिली. आरोपी देशाची गोपनीय माहिती संबंधित महिलेला व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलद्वारे पाठवत होता. या बदल्यात पाकिस्तानी एजंट त्याला सतत पैसे पाठवत होती.

असा अडकला हनी ट्रॅपमध्ये आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, ‘तो पूर्वी संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या अवाडी चेन्नई इथल्या अवजड वाहन निर्मिती कारखान्यात लिपिक म्हणून काम करत होता. तोफ आणि रणगाड्यांसह इतर संरक्षणविषयक उपकरणं तिथे बनविली जातात. तिथे काम करत असतानाच त्याची फेसबुकवर शान्वी शर्मा (खोटं नाव) या तरुणीशी ओळख झाली. हळूहळू या शान्वी शर्मानं त्याला ‘सोना’ ‘बाबू’ म्हणत हनी ट्रॅपमध्ये अडकवलं आणि नंतर प्रेम आणि पैशांचं आमिष दाखवून त्याच्याकडून व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलद्वारे बरीच गुप्त माहिती घेतली. त्या बदल्यात ती त्याच्या अकाउंटवर मोठी रक्कम पाठवत राहिली.’ हेही वाचा :  अंधश्रद्धा बेतली जिवावर मी तुला पुन्हा जिवंत भेटेन म्हणत तरुणाने केली आत्महत्या मोबाइलमध्ये सापडली संवेदनशील कागदपत्रं मुझफ्फरपूरच्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं, की पोलिसांनी आरोपीच्या बँक अकाउंटची माहिती घेतली असून ते एसबीआय बँकेत आहे. या अकाउंटवरून अनेक संशयास्पद व्यवहार झाले आहेत. पोलिसांनी हे अकाउंट गोठवलं आहे. यासोबतच आरोपीविरुद्ध कटरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीच्या मोबाइल फोनच्या गॅलरीत अनेक गोपनीय आणि संवेदनशील कागदपत्रं सापडली आहेत. ही कागदपत्रं एक तर आरोपीनं पाठवली आहेत किंवा तो ती संबंधित महिलेला पाठवणार होता. ही कागदपत्रं शत्रूंच्या हाती लागल्यास राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते.’ हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलताना भान ठेवण्याची गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या