JOIN US
मराठी बातम्या / देश / वाहतूक पोलिसाने दुचाकी थांबवल्याचा राग, भररस्त्यात होमगार्डची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

वाहतूक पोलिसाने दुचाकी थांबवल्याचा राग, भररस्त्यात होमगार्डची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

बाडमेर शहरात नेहरू नगर ओव्हर ब्रिजवर चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला वाहतूक पोलिसांनी अडवले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बाडमेर, 3 जुलै : राजस्थानच्या बाडमेर (Barmer Rajasthan) जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे. याठिकाणी चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला रोखणे वाहतूक पोलिसासोबत (Traffic Police) धक्कादायक प्रकार घडला. वाहतूक पोलिसाच्या दुचाकीस्वार होमगार्डला रोखल्यामुळे संतप्त झालेल्या होमगार्डने पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर (Homeguard Fight with Traffic Police) पकडून बेदम मारहाण केली. ही घटना बाडमेर शहरात घडली. काय आहे प्रकरण -  बाडमेर शहरात नेहरू नगर ओव्हर ब्रिजवर चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला वाहतूक पोलिसांनी अडवले. दुचाकीचालक होमगार्ड यावरुन खूप संतप्त झाला. यावेळी होमगार्ड आणि त्याच्या एका साथीदाराने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यासोबतच होमगार्डने पोलीस कर्मचाऱ्याला कॉलर पकडून मारहाण करण्याचाही प्रयत्न केला आहे. नेहरू नगर ओव्हरब्रिजवरून चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलीस कर्मचाऱ्याने अडवले. तेव्हा दुचाकीस्वाराचा सहकारी होमगार्ड जवानाने पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा वाहतूक प्रभारी डिंपल कंवर याही तिथे हजर होत्या आणि सर्व प्रकार पाहत राहिल्या. यानंतर आजूबाजूच्या वाहनचालकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करून प्रकरण शांत केले. अशा परिस्थितीत वर्दळीचा रस्ता अशाच भरदिवसा खोळंबत असेल, तर ‘सामान्य माणसावर विश्वास, गुन्हेगारांमध्ये भीती’ हे पोलिसांचे ब्रीदवाक्य कसे प्रस्थापित होणार, हाही मोठा प्रश्न आहे. बाडमेर शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या संपूर्ण घटनेने रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. हेही वाचा -  वय वर्ष फक्त 5; मात्र, तिने केला हा कारनामा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद होमगार्डने मारहाणीनंतर दलित समाजातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला या घटनेची तक्रार किंवा तक्रार कोणाकडेही करू नका, अशी धमकीही दिली. दरम्यान, ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या