Himachali Girl Baljeet Kaur Conquered Mount Everest : 17 मे 2022 रोजी रात्री 10 वाजता बलजीत कौर टीमसोबत माऊंट एव्हरेस्टसाठी रवाना झाली. पाच दिवसांच्या संघर्षानंतर बलजीत कौरने माऊंट एव्हरेस्टवर पोहोचण्यात यश मिळवलं.
तिने दुसऱ्या प्रयत्नात हे लक्ष्य गाठलं असून गेल्या वेळी ती फक्त 300 मीटर अंतरावर होती, तेव्हा तिला परतावं लागलं होतं. मात्र, यावेळी बलजीत कौरने सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवला आहे.
बलजीत कौर सोलन जिल्ह्यातील कुनिहार येथील आहे. बलजीत कौर 2016 मध्ये माऊंट एव्हरेस्ट मोहिमेतही सामील झाल्या होत्या, परंतु त्यादरम्यान ऑक्सिजन मास्क खराब झाल्यामुळे त्यांना परतावं लागलं होतं.
त्यावेळी बलजीत 8848.86 मीटर उंच माऊंट एव्हरेस्टपासून अवघ्या 300 मीटर अंतरावर होती. पण बलजीतने हार मानली नाही आणि आता आपले ध्येय पूर्ण केलं आहे.
बलजीत कौर 17 मे 2022 रोजी रात्री 10 वाजता टीमसोबत माऊंट एव्हरेस्टसाठी रवाना झाली होती. पाच दिवसांच्या संघर्षानंतर बलजीतने हे लक्ष्य गाठलं.
12 मे 2022 रोजी बलजीतने 8566 मीटर उंच कांचनजंगा पर्वतावर तिरंगा फडकवला. बलजीत कौरसोबत तिचे मार्गदर्शक मिग्मा शेर्पाही होते.
बलजीत कौरचे कुटुंबीय आता तिच्या घरी परतण्याची वाट पाहत असून त्यांनी तिच्या स्वागताची तयारी सुरू आहे.