JOIN US
मराठी बातम्या / देश / तू माझा कुत्रा चोरलास! 2 तरुणींमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा VIDEO VIRAL

तू माझा कुत्रा चोरलास! 2 तरुणींमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कुल्लू, 26 डिसेंबर : चोरीवरून झालेली भांडणं अनेकदा पाहिली असतील पण श्वान चोरल्यामुळे झालेला वाद आणि त्यातून भर रस्त्यात हाणामारी झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. श्वान आणि पर्स चोरल्याच्या रागातून दोन तरुणींमध्ये तुफान राडा झाला आहे. हिमाचल प्रदेश जिल्हा मुख्यालय असलेल्या महिला पोलीस स्टेशन कुल्लूजवळ मुलींमधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन ते तीन जणी एका तरुणीला बेदम मारहाण करत आहेत. एका व्हिडीओमध्ये एक तरुणी दुसऱ्या तरुणीवर श्वान चोरल्याचा आरोप लावत आहे. श्वान चोरल्याच्या रागातून पहिली तरुणी दुसऱ्या तरुणीच्या थोबाडीत लगावते. त्यानंतर पर्स चोरल्याचा आळ देखील घेते.

हे वाचा- कारचं बोनेट उघडलं आणि चालकाची बोबडीच वळली, नेमकं काय घडलं पाहा थरारक VIDEO या तरुणी ज्या ठिकाणी भांडत आहेत तिथून काही अंतरवर पोलीस ठाणे आहे. या तरुणींमधील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ काही तरुणांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला असून त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियामध्ये व्हायरल होणारा हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या