JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / बापरे! चिमुकलीच्या तोंडात घुसला स्टीलचा डबा, भयंकर स्थिती पाहून डॉक्टरही हादरले.. PHOTOS

बापरे! चिमुकलीच्या तोंडात घुसला स्टीलचा डबा, भयंकर स्थिती पाहून डॉक्टरही हादरले.. PHOTOS

हरियाणाच्या रोहतक पीजीआय आणि डेंटल कॉलेजच्या डॉक्टरांनी यशस्वी ऑपरेशन करून अपघातग्रस्त झालेल्या 3 वर्षीय मुलीला नवजीवन दिलं आहे. जिंद जिल्ह्य़ातील जुलाना येथील इशिका या 3 वर्षांची मुलगी अचानक तिच्या घरातील स्टीलच्या डब्यावर पडली. हा डबा इतका धारदार होता की, तो मुलीच्या चेहऱ्यात घुसला. कुटुंबीयांनी तिला जुलाना येथील रुग्णालयात नेलं. परंतु, मुलीची स्थिती पाहता तिला रोहतक पीजीआयमध्ये रेफर करण्यात आलं.

0105

मुलगी पीजीआयमध्ये येताच तिची अवस्था पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले की, मुलीच्या तोंडात स्टीलचं भांडं खोलवर गेल्यानंतरही मुलगी श्वास घेत आहे. मात्र, डब्यामुळे तिचं नाक व तोंड पूर्णपणे झाकलं गेलं होतं.

जाहिरात
0205

या गुंतागुंतीच्या ऑपरेशनबद्दल डॉक्टरांनी सांगितलं की, मुलीची तपासणी केली असता, मुलीच्या डोक्यात आणि जबड्यात डबा अडकल्याचं दिसून आलं. टिफिनमध्ये साबणाची वडी असल्याने मुलाला श्वास घेण्यासही त्रास होत होता. मुलीचं तत्काळ सिटी स्कॅन करण्यात आलं, ज्यामध्ये टिफिनचा मोठा भाग कपाळ आणि जबड्यात अडकल्याचं आढळून आलं.

जाहिरात
0305

जर डबा ड्रिलने कापला असता, तर त्याच्या कंपनांमुळे मुलीच्या मेंदूला गंभीर इजा होऊन मृत्यूही ओढवू शकला असता, असं डॉक्टरांनी सांगितलं. अशा परिस्थितीत मेटल बार आणि मेटल डिस्कच्या सहाय्याने टिफनचे दोन भाग करण्याचं ठरवलं, जेणेकरून कटिंगमुळे होणाऱ्या कंपनांनी मेंदूच्या भागाला इजा होऊ नये. यानंतर, डबा मधून कापून दोन भाग करण्यात आले.

जाहिरात
0405

जबड्याच्या बाजूला अडकलेला डब्याचा भाग आधी मधोमध कापून काढण्यात आला. त्यानंतर त्यात अडकलेली साबणाची वडी काढण्यात आली. यानंतर मुलीला बेशुद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर तिच्या कपाळात अडकलेला डब्याचा भाग बाहेर काढण्यात आला.

जाहिरात
0505

सलग 7 तास चाललेलं ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालं असून सध्या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मुलीला सध्या न्यूरो सर्जरी विभागाच्या आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांना दोन मुली असून मोठ्या मुलीला ही दुखापत झाली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या