Kisan Aandolan: या गावात जेजेपी आणि बीजेपी नेत्यांना येण्या-जाण्यास बंदी आहे. कोणी नेता आल्यास त्याने त्याच्या जबाबदारीवर यावे, असंही सांगण्यात आलं आहे.
या गावात जननायक जनता पार्टी (jjp) आणि भारतीय जनता पार्टीसाठी (bjp) बॅनर लावण्यात आले आहेत. जेजेपी आणि बीजेपी नेत्यांनी गावात येऊ नये असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.
हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील कनीपला गावात असे बॅनर लावण्यात आले आहेत. जर नेते या गावात आले, तर त्यांच्या परिस्थितीसाठी ते स्वत: जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
या गावातील शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, कोणत्याही पार्टीचा नेता, जो शेतकऱ्यांना विरोध करतो, त्याला गावात येऊ देणार नाही. शेतकरी या नेत्यांवर नाराज असून, गावात कोणी नेता आल्यास त्याने त्याच्या जबाबदारीवर यावे असंही बॅनरवर म्हटलं आहे.
यापूर्वीही प्रदेशातील अनेक गावांनी अशाप्रकारचे बॅनर लावून, बीजेपी आणि जेजेपी नेत्यांचा विरोध केला आहे.
जो शेतकऱ्यांसोबत उभा राहील, तोच गावात पुढे जाईल, अशा आशयाच्या घोषणा गावात शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहेत. तसंच अशाप्रकारचे अनेक बॅनर गावात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.