वाराणसी मधील ज्ञानवापी मशिदी (Gyanvapi Mosque) प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
वाराणसी, २० मे : वाराणसी मधील ज्ञानवापी मशिदी (Gyanvapi Mosque) प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने (supreme court ) तीन पर्याय सूचवले आहे. तसंच, जस्टिस डीवाई चंद्रचूड़ यांनी जिल्हा सत्र न्यायालयाने आपल्या अधिकारानुसार सुनावणी घ्यावी, कारण हा न्यायालयीन अनुभवाचा अधिकार आहे.‘असं मत नोंदवलं आहे. तसंच, सुप्रीम कोर्टाने यापूर्वीचा आदेश कायम ठेवला आहे. वाराणसी सत्र कोर्ट सुनावणी घेऊ शकणार नाही, पुढील ८ आठवड्यापर्यंत आदेश कायम आहे. सर्व प्रकरण आता जिल्हा कोर्टाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहे. ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस डीवाई चंद्रचूड़, जस्टिस नरसिम्हा आणि जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने निर्देश दिले की, खालच्या कोर्टाने मुस्लिम गटाच्या अर्जावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी आणि विषय निकाली काढावा. तसंच, जोपर्यंत सत्र न्यायालय या प्रकरणाच्या अर्जावर निर्णय घेत नाही. तोपर्यंत आमचा अंतरिम आदेश कायम राहणार आहे, असं कोर्टाने स्पष्ट केलं. तसंच, आम्ही खालच्या कोर्टाला लवकरात लवकर सुनावणी घेण्यास कोणताही दबाव किंवा विशेष आदेश देऊ शकत नाही. कारण ते आपल्या कामात योग्य आहे, सर्व प्रकरण हे जिल्हा कोर्टाकडे वर्ग करण्यात यावे, या प्रकरणावर आठ आठवड्यात सुनावणी घ्यावी, असं निर्देश कोर्टाने दिले आहे. तसंच, सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग केले, ते पुढील सुनावणी करतील.शिवलिंगाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जुना आदेश कायम राहणार आहे. उत्तर प्रदेश सरकार वजू करण्याची व्यवस्था करेल, सर्वोच्च न्यायालय जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. ज्ञानवापी मशिदीच्या विहिरीत सापडले शिवलिंग दरम्यान, वारणासीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम सोमवारी संपले. या सर्वेक्षणाचा शेवट वादळी झाला. तिसऱ्या दिवसाचं सर्वेक्षण समाप्त होताच मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षानं केला आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन (Vishnu Jain) यांनी पाहणीदरम्यान विहिरीच्या (Well) आत शिवलिंग सापडल्याचा दावा केला. शिवलिंगाच्या संरक्षणासाठी आता पुन्हा सिव्हिल कोर्टामध्ये (Civil Court) अर्ज केला जाणार आहे. हिंदू पक्षातले सोहनलाल यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मशिदीत बाबा सापडले आहेत. तेच बाबा ज्याची नंदी वाट पाहत होता. मशिदीमध्ये शिवलिंग मिळाल्यानंतर हर हर महादेव अशा घोषणा देण्यात आल्या तसंच सर्वांनी आनंद साजरा केला. आता पश्चिमेकडच्या दरवाजाजवळ असलेल्या अवशेषांची तपासणी करण्याचीही आम्ही मागणी करणार आहोत,’ असं सोहनलाल म्हणाले. हिंदू पक्षाच्या दाव्यानुसार 12 फूट 8 इंच व्यासाचं शिवलिंग सापडलं आहे. या शिवलिंगाचं तोंड नंदीकडे असून, वजूस्थळातलं सर्व पाणी काढून केलेल्या पाहणीवेळी ते आढळल्याचा त्यांचा दावा आहे. मुस्लीम पक्षानं मात्र हा दावा फेटाळला आहे. ज्ञानवापी मशिद समितीनं या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या सर्वेक्षणाला थांबवण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे. सर्वोच्च न्यायालयात या विषयावर मंगळवारी सुनावणी होऊ शकते. सर्वेक्षणाचा रिपोर्ट सार्वजनिक होणार की नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालय सुनावणी पार पडली.