JOIN US
मराठी बातम्या / देश / इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास होणार सुस्साट! मुंबई-दिल्ली 'Electric Highway'ची योजना, नितीन गडकरींची माहिती

इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास होणार सुस्साट! मुंबई-दिल्ली 'Electric Highway'ची योजना, नितीन गडकरींची माहिती

इलेक्ट्रिक महामार्ग (E-Highway) हा खास इलेक्ट्रिक वाहनांसाठी असतो. विजेवर चालणारी वाहनंच या महामार्गाचा वापर करतात. इलेक्ट्रिक महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या विजेचा पुरवठा केला जातो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जुलै: इलेक्ट्रिक वाहनांबद्द्ल (Electric Vehicles) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) कायमच आग्रह धरत असतात. आता गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या दृष्टिनेच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. झी न्यूजच्या वेबसाईटवर याबद्दलचं वृत्त देण्यात आलं आहे.

केंद्र सरकार दिल्ली आणि मुंबईदरम्यान एक इलेक्ट्रिक महामार्ग (Delhi to Mumbai Electric Highway ) तयार करण्याचा विचार करत आहे. भविष्यातील वाहतुकीसंबंधी गडकरी नेहमीच घोषणा करत असतात. त्यामुळे त्यांच्या घोषणांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं. गुरुग्राममधल्या हायड्रॉलिक ट्रेलर ओनर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. अर्थातच देशवासीयांसाठी ही खूशखबर आहे. इलेक्ट्रिक महामार्ग (E-Highway) हा खास इलेक्ट्रिक वाहनांसाठी असतो. विजेवर चालणारी वाहनंच या महामार्गाचा वापर करतात. इलेक्ट्रिक महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या विजेचा पुरवठा केला जातो. ही वीज रस्त्याच्या वर लावण्यात आलेल्या तारांच्या माध्यमांतून वाहनांपर्यंत पोहोचवली जाते.

Business Idea: Plastic ला पर्याय आला, सहजपणे विकल्या जातील ‘या’ वस्तू, होईल मोठी कमाई

ई हायवे (E-Highway कसा असतो?

इलेक्ट्रिक हायवे (E-Highway) किंवा ग्रीन हायवे (Green Highway) अगदी विशेषप्रकारे तयार करण्यात येतो. या हायवेवर भरपूर हिरवळ असते. त्यामुळे अर्थातच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही काळजी घेतली जाते. या इलेक्ट्रिक हायवेवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक खास लेन असेल. या लेनमधून केबलच्या माध्यमातून ही वाहने चालतील. या केबलवर चालणारी स्पेशल बस आणि ट्रेन्स सरकारच्या वतीने या हायवेवर चालवल्या जातील. या बसेस 120 किमी प्रतितास या वेगाने चालतील. या हायवेच्या दोन्ही बाजूंना विजेच्या लाईन्स असतील. यावरून अवजड वाहनंही वेगाने जाऊ शकतील. यामुळे प्रदूषण कमी होईल. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून सरकार या वाहनांकडे पाहत आहे. ई-हायवेवर विजेवर चालणारी वाहनांची संख्या जास्त असेल. या ई-हायवेवरून चालणाऱ्या बसेसमधून सर्वसामान्य लोक निम्म्या वेळेत प्रदुषणमुक्त प्रवास करू शकतील, अशी सरकारची संकल्पना आहे.

सर्व जिल्हे चौपदरी रस्त्यांनी जोडले जाणार

मात्र या योजनेबद्दल गडकरींनी आपल्या भाषणात अधिक सविस्तर माहिती दिली नाही. ‘ई-हायवेवर ट्रॉलीबससारखा ट्रॉलीट्रकही चालवता येऊ शकतो’, असंही गडकरींनी सांगितलं. ट्रॉलीबस ही एक प्रकारची इलेक्ट्रिक बस असते. ही बस ओव्हरहेड तारांमधून होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यावर चालते. सर्व देशातील सर्व जिल्हे चौपदरी रस्त्यांनी (Four Lane Road) जोडले जाणार असल्याचा निर्णय रस्ते मंत्रालयानं घेतल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. तसंच देशभरात 2.5 लाख कोटी रुपयांचे बोगदे बांधणार असल्याचंही गडकरींनी सांगितलं.

अग्निपथ भरती: नौदलात पहिल्या बॅचमध्ये असणार 20 टक्के महिला उमेदवार; असं करा अप्लाय

राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी या कार्यालयांमधील सर्व सेवा डिजिटल (Digital Services) करण्याची गरज असल्याचं गडकरी म्हणाले. येत्या एक ते दोन वर्षांमध्ये इलेक्टिकल व्हेईकल्सची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांएवढीच होणार असल्याचं सांगून गडकरींनी यापूर्वी अनेकांना वाहनचालकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. पेट्रोल-डिझेलच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिकल वाहनखरेदीला प्रोत्साहन देत आहे. मात्र अजूनही या वाहनांच्या किंमती जास्त असल्याने ही वाहनं फारशी खरेदी केली जात नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या