उत्तर प्रदेश, 20 जुलै: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह ( Former Uttar Pradesh chief minister Kalyan Singh ) यांची प्रकृती चिंताजनक ( Health condition) आहे. श्वास घेताना त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर (Ventilator Support) ठेवण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लखनऊ पीजीआय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना क्रिटिकल केअर मेडिसन विभागाच्या डॉक्टर्संनी व्हेंटिलेटरवर ठेवलं. शनिवारपासून कल्याण सिंह यांना श्वास घेताना त्रास होत होता. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखीन ढासळली. त्यातच पीजीआयच्या डॉक्टर्सचं म्हणणं आहे की, माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना ICU मध्ये ठेवलं आहे. डॉक्टर्संची टीम सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. डॉक्टर्संच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या कुटुंबियांनाही रुग्णालयात बोलावलं आहे. योगी आदित्यनाथ रुग्णालयात माजी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची बातमी समजताच सीएम योगी आदित्यनाथ यांनी रविवारी पीजीआय रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या वेळी मंत्री सुरेश खन्ना आणि कल्याण सिंग यांचे नातू संजीव सिंह हे देखील उपस्थित होते. चिंताजनक! लसीकरण झालेल्या महिला डॉक्टरला Coronaच्या दोन व्हेरिएंटची लागण गेल्या 15 दिवसांत मुख्यमंत्री सीएम योगी चार वेळा कल्याण सिंह यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले. गेल्या बऱ्याच दिवसांपासून कल्याण सिंह आजारी आहेत. 21 जूनला ब्लड शूगर आणि ब्लड प्रेशरचा त्रास झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पंतप्रधानांकडून विचारपूस सुरुच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कल्याण सिंह यांच्या प्रकृतीची सतत विचारपूस करतात. मोदी फोनवरुन त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेत असतात. त्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, शाहनवाज हुसैन, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह काही नेत्यांनी रुग्णालयात जाऊन कल्याण सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.