JOIN US
मराठी बातम्या / देश / Manmohan Singh Health Update: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत बिघडली; AIIMS च्या Cardio Department मध्ये भरती

Manmohan Singh Health Update: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत बिघडली; AIIMS च्या Cardio Department मध्ये भरती

माजी पंतप्रधानांना या वर्षीय कोरोनाची लागण झाली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांची तब्येत अचानक बिघडल्याचं वृत्त समोर आलं आहे. सध्या त्यांना एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एम्समधील कार्डियो टॉवरमध्ये डॉ. नितीश नायक आणि त्यांच्या टीमच्या निरीक्षणाखाली मनमोहन सिंग यांना ठेवण्यात आलं आहे. मात्र मनमोहन सिंग यांना नेमकं काय झालं, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. (Former PM Dr Manmohan Singhs admitted in AIIMS Cardio department ) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ताप आल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आला होता, आणि आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. हे ही वाचा- महात्मा गांधींच्या सूचनेनुसार सावरकरांनी केलेली दया याचिका : राजनाथ सिंह 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग यांना या वर्षी कोरोनाची लागण झाली आहे. ते 19 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मनमोहन सिंग यांनी 4 मार्च आणि 3 एप्रिल रोजी कोरोनाच्या दोन्ही लशी घेतल्या होत्या. बातमी अपडेट होत आहे…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या