आसाम, 11 डिसेंबर: आसाम पोलिसांनी (Assam Police) दुबई पोलिसांच्या (Dubai Police) मदतीनं एक महत्त्वाची मोहीम पार पाडली आहे. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलर डिएगो माराडोना (Diego Maradona Watch) यांचे घड्याळ चोरणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दोन्ही एजन्सींनी मिळून ही कारवाई केली आहे. तसंच आरोपीकडून घड्याळही जप्त केलं आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आसाम पोलिसांनी ज्या व्यक्तीकडून हे घड्याळ जप्त केले आहे, त्यालाही अटक करण्यात आली आहे. आसाम पोलिसांचे DGP ज्योती महंता यांनी दुबई पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाई संदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, डिएगो माराडोना यांचे घड्याळ आसामच्या चराईदेव जिल्ह्यातून जप्त करण्यात आलं आहे, त्यासोबत त्या व्यक्तीला ही अटक केली आहे. आज तकनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. हेही वाचा- 25 वर्षांची नोकरी, 30 लाखांच्या साड्या; विश्वासघाताची ही कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का DGP कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, आम्ही चराईदेव जिल्ह्यातील मोरानहाट भागातून वाजिद हुसेन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. ज्याच्याकडून दिवंगत फुटबॉलर डिएगो माराडोना यांचं Hublot कंपनीचे लिमिटेड एडिशन घड्याळ जप्त केलं आहे. ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे तो मूळचा आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील असल्याची माहितीही डीजीपींनी दिली. त्याच वेळी, शिवसागर जिल्ह्याच्या एसपींनी सांगितलं की, अटक केलेला व्यक्ती दुबईमध्ये काम करत होता आणि ऑगस्ट 2021 मध्ये भारतात परत आला होता.
शिवसागर एसपी राकेश रोशन यांनी देखील माहिती दिली की, त्यांना गुप्तचर माहिती मिळाली होती. ज्या अंतर्गत पोलिसांनी वाजिद हुसैन याला मोरनहाट भागात त्याच्या सासरच्या घरातून अटक केली आणि दिवंगत फुटबॉलर डिएगो माराडोना यांचं Hublot कंपनीचे लिमिटेड एडिशन घड्याळ जप्त केलं आहे. त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. हेही वाचा- बघता बघता गंगा नदीत वाहून गेली संपूर्ण शाळा, VIDEO पाहून येईल अंगावर काटा मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, संयुक्त आंतरराष्ट्रीय मिशन अंतर्गत आसाम पोलीस आणि दुबई पोलिसांनी वाजिद हुसेन नावाच्या व्यक्तीकडून दिग्गज फुटबॉलर डिएगो माराडोना यांचे Hublot कंपनीचे लिमिटेड एडिशन घड्याळ जप्त केले आहे. वाजिदला कायद्यानुसार शिक्षा होईल. कळवू की अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलर डिएगो माराडोना यांचे 25 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. माराडोनाचे भारतात खूप चाहते आहेत.